चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे अवैध दारू अड्ड्यांवर छापे

६५ हजारांची दारू केली नष्ट
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे अवैध दारू अड्ड्यांवर छापे

चाळीसगाव । Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील सांगवी, बाणगाव, खेरडे, शिवारात अवैधरित सुरू असलेल्या गावठी दारूच्या (village liquor) अड्ड्यांवर चाळीसगाव पोलिसांनी (rural police ) छापेमारी (raids) करून तब्बल ६५ हजार ८०० रूपयांची दारू नष्ट केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा (crime) दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की चाळीसगाव ग्रामीण पोलीस (rural police ) स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील सांगवी, बाणगाव, खेरडे शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांच्या पथकाने छापेमारी (raids) केली.

यात पोलिसांनी 56 हजार रुपयांची दारू. तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे पक्के रसायन असा एकूण 65 हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल जागेवर नष्ट (Material destroyed on the spot) केला. ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संजय ठेगे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार पोलीस नाईक शांताराम पवार, देवीदास पाटील, भूपेश वंजारी, ज्ञानेश्वर बडगुजर, प्रेमसिंग राठोड, आदिच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com