बनावट कागदपत्राव्दारे ९१ लाखांची शेतजमिनीची खरेदी-विक्री

चाळीसगाव पोलीस स्टेशनला सब रजिस्टरसह दहा जणांविरोधात गुन्हा
बनावट कागदपत्राव्दारे ९१ लाखांची शेतजमिनीची खरेदी-विक्री

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे शिवारातील गट नं.६९/०१ मधील शेतजमीन मुळ मालकाला न माहितीने बनावट कागदपत्रे तयार करुन...

तब्बल ९१ लाख रुपयांना सोलर कंपनीला खरेदी-विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला तात्कालीन सब रजिस्टसह १० जणांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

मुळ मालक गीता गोविंद कुलकर्णी यांची तालुक्यातील बोढरे शिवारात गट नं.६९/०१ मध्ये शेत जमीन आहे. परंतू दि.३/०८/२०१८ रोजी त्याना न माहितीने सुरेंद्रकुमार आर्य, निशांत आर्य, सुशिल आर्य, भगवान दत्त शर्मा, कुशाग्र अग्रवाल, यशप्रिय आर्य, नाना पुंडलिक पाटील, मनिषा उपासनी, डेटा इंट्री ऑपरेटर(पूर्ण नाव माहिती नाही), व इतर तीन अनोखळी व्यक्ती यांनी आप आपसात संगनमताने वेगवेगळ्या बनावट व्यक्ती, वेगवेगळे बनावट कागदपत्रे तयार करुन आर्थिक लाभासाठी केदार चावरे यांची शेतजमीन बोढरे शिवारातील सोलर कंपनीला, ९१ लाख रुपयांना शेत जमीनीची फसवणुकीच्या उद्देशाने खरेदीखत केले.

या फसवणुकीसाठी तत्कालीन सब रजिस्टर मनिषा उपासनी व चाळीसगाव येथील कार्यालयातील डेटा ऍन्टी आपरेटर यांनी मदत केल्याचे तक्रारीतन म्हटले आहे.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ऍड.केदार चावरे रा.शाहु नगर, चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरुन तात्कालीन रजिस्टर मनिषा उपासनीसह सुरेंद्रकुमार आर्य, निशांत आर्य, सुशिल आर्य, भगवान दत्त शर्मा, कुशाग्र अग्रवाल, यशप्रिय आर्य, नाना पुंडलिक पाटील, डेटा इंट्री ऑपरेटर(पूर्ण नाव माहिती नाही) व इतर तीन बनावट अनोखळी व्यक्ती यांच्यावर भादवी कलम ४२०सह विविध कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे चाळीसगावात जमीन-खरेदी विक्री करणारी मोठी टोळी असून या टोळीचा संपूर्ण छडा लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com