चाळीसगाव पोलिसांंनी एकास जिल्ह्यातून केले हद्दपार

चाळीसगाव पोलिसांंनी एकास जिल्ह्यातून केले हद्दपार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील महाविर व्यायम शाळेजवळ राहणार्‍या दत्तात्रय उर्फ दत्तु मुकुंदा चौधरी वय ३९ वर्षे रा. याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. ला खुनाचा प्रयत्न २, गंभीर दुखापत ४, साथीदारांना सोबत घेवुन दंगल करणे २ असे एकुण ८ गुन्हे दाखल होते. तसेच नमुद इसमाविरुध्द वेळोवेळी प्रतीबंधात्मक कारवाई करण्यात येवुन देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नव्हता. त्याची गुन्हे करण्याची साखळी चालुच होती. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणार्‍या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यामुळे त्याला चाळीसगाव पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

दत्तात्रय उर्फ दत्तु मुकुंदा चौधरी त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड संहीता अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणार्‍या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती. दिवसे-दिवस वेगवेगळया तर्‍हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याचे विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार संदीप पाटील, पोलीस निरीक्षक यांनी एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे इसम नामे दत्तात्रय उर्फ दत्तु मुकुंदा चौधरी याचे विरुध्द सचिन कापडणीस, सहा. पोलीस निरीक्षक, पोना. विनोद भोई, पोना. तुकाराम चव्हाण, पोना. रविंद्र पाटील, पोना. दिपक प्रभाकर पाटील, पोकॉं. चत्तरसिंग महेर, पोकॉ. प्रविण साहेबराव जाधव यांच्या मदतीने हद्दपार प्रस्ताव तयार करुन पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन उपविभागीय दंडाधिकारी चाळीसगांव यांच्या कार्यालयात पाठविला होता. दिनांक २४/०५/२०२३ रोजी उपविभागीय दंडाधिकारी चाळीसगांव भाग, चाळीसगांव यांच्या कार्यालयाकडील आदेश क्रमांक दंडप्र./हद्दपार/क्र.१/२०२३ चाळीसगांव अन्वये मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) अन्वये दत्तात्रय उर्फ दत्तु मुकुंदा चौधरी याचे विरुध्द जळगांव जिल्ह्यातुन आदेश जारी झालेचे दिनांकापासुन ६ महिन्याच्या कालावधी पावेतो करण्यात केल्याने दिनांक १६/०६/२०२३ रोजी सदर इसमास ताब्यात घेण्यात येवुन त्यास धुळे जिल्ह्यातील चाळीसगांव रोड पोलीस स्टेशन हद्दीत रवानगी करण्यात आलेली आहे. तरी पोलीसांकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, दत्तात्रय उर्फ दत्तु मुकुंदा चौधरी हा चाळीसगांव शहरात अथवा हद्दीत दिसल्यास त्याच्याबाबत चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला येवुन निर्भीडपणे येवुन कळवावे. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. जेणे करुन अशा गुन्हेगारांविरुध्द वेळीच कारवाई करुन, अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यास मदत होईल.

यापुर्वी देखील सराईत गुन्हेगार नामे निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय २१ वर्षे रा. नारायणवाडी, चाळीसगांव व वाजीदखान साबीरखान वय २३ वर्षे रा. नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगांव ता. चाळीसगांव याच्याविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करुन अनुक्रमे मध्यवर्ती कारागृह, अमरावती तसेच मध्यवर्ती कारागृह, येरवडा जि. पुणे येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे. यापुढे भविष्यात अशा प्रकारचे सराईत गुन्हे करुन, चाळीसगांव शहराची शांतता भंग करणारे तसेच शहरात दहशत माजविणार्‍या गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांविरुध्द मोक्का, एम.पी.डी.ए., हद्दपार व इतर कठोर कायद्यान्वये अतीशय कडक कारवाई करुन त्यांना जास्तीत जास्त दिवस कारागृहात स्थानबध्द अगर हद्दपार करण्यात येईल.

संदीप पाटील, पोलीस निरीक्षक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com