चाळीसगाव : अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

चाळीसगाव : अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

चाळीसगाव पोलिसांकडून दोघांना अटक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातलगत असलेल्या करगावरोड परिसरात एक १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर दोघां तरुणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

चाळीसगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला मोटरसायकलवर बसवून शहरालगत असलेल्या करगाव रोड परिसरात निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्या अजाणपणाचा फायदा घेत, पडीत घरात नेऊन संशयित आरोपी शेख सलिम शेख वजीर व हमीद बिरीम पिंजारी दोघे राहणार सुवर्णाताई नगर चाळीसगाव यांनी तिच्यावर आळीपाळीने पाशवी अत्याचार केले. त्रास होऊ लागल्याने घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आईने नातेवाईकांना घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले. तरूणीने आप बिती कथन केल्यावनंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा कलम ३७६A, ३५४ अ, ३६६ अ, ३६३, ४,५ ग,६ (८) प्रमाणे दोघांना तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com