पं.स. गण आरक्षण सोडत : चाळीसगावात गणांची संख्या वाढली; 'इतक्या' गणांमध्ये होणार निवडणूक

आरक्षण जाहिर होताच इच्छुकांच्या आशा पल्लवीत
पं.स. गण आरक्षण सोडत : चाळीसगावात गणांची संख्या वाढली; 'इतक्या' गणांमध्ये होणार निवडणूक

चाळीसगाव |Chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगव पंचायत समितीतील निर्वाचक गणांची आरक्षणाची (२०२२) प्रक्रिया आज (दि,२८) तहसीलदार अमोल मोरे यांच्या अध्यक्षखाली झालेल्या सभेत जाहिर करण्यातआली. यापूर्वी चाळीसगांव पंचायत समिती गटात १४ गण होते. आता ही गण संख्या १८ वर गेली असून या १८ गणांची आरक्षण सोडत आज जाहिर करण्यात आली. तर आरक्षण जाहिर होताच अनेकांनी सोशल मिडीयावर भावी पं. स. सदस्याबाबत भाऊ, दादा, काकाच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळे अनेक चर्चांना उधान आले आहे....

असे राहिल नवीण गणनूसार आरक्षण-

कळमडू-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला,

बहाळ-अनुसूचीत जमाती महिला,

वाघळी-सर्वसाधारण,

हातले-अनुसूचीत जमाती,

पातोंडा- नागारीकांची मागास प्रवर्ग महिला,

टाकळी प्र.चा.-नागरिकांचा मागास प्रवर्ग,

भोरस बु-अनुसूचीत जाती महिला,

उंबरखेड-नागरिकांचा मागास प्रवर्ग,

मेहुणबारे-अनुसूचीत जाती,

वरखेडे बु.-सर्वसाधारण,

पिलखोड-सर्वसाधारण महिला,

सायगाव-सर्वसाधारण महिला,

तळेगाव-सर्वसाधारण,

हिरापूर -सर्वसाधरण महिला,

पिंपरखेड-सर्वसाधरण,

रांजणगांव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला,

वलठाण-सर्वसाधारण महिला,

घोडेगाव-सर्वसाधरण.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com