चाळीसगाव : एकावर चॉपरने वार

शहरात हॉपमर्डरची लागोपाठ दुसरी घटना, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न चिन्ह
चाळीसगाव : एकावर चॉपरने वार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील घाट रोडवरील छाजेड ऑईल मिल (Oil mill) पाठीमागे भागात एकावर चॉपरने हल्ला करुन, त्या गंभीर केल्याचा घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात हॉपमर्डरची ही दुसरी घटना घडल्याने शहरातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत असून पोलिसांच्या (police) कार्यपद्धतीवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील घाट रोडवरील छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे माजी नगरसेवक अण्णा कोळी यांच्या घरासमोर वैभव अरूण रोकडे, भूषण रघुनाथ मंजाळ, आणि सौरव आंनदा कोळी हे उभे असतांना त्याठिकाणी रात्रीच्या ११ वाजेच्या सुमारास हैदरअली असीफ अली, नदीम खान साबीर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख वाजिद खान, साबीर खान, नवाज (पूर्ण नाव माहित नाही.) आणि त्यांच्यासोबत दोन अनोळखी इसम त्याठिकाणी आले. यातील हैदर अली याने त्यांना तेथे पाहातचं इनको आज जिंदा मत छोडो असे म्हणून वरील सर्वांनी तिघांवर हल्ला चढविला. या हल्लयात हैदर अली याने त्याच्या हातातील चॉपरने भूषण मंजाळ याच्या पेाटावर वार केला, वार अडवतांना भूषण याच्या उजव्या मांडीवर लागला, तर अन्य आरोपींनी ही लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात भूषण मंजाळसह वैभव रोकडे, सौरव कोळी असे तिन्ही जखमी झाल्याचे तक्रार वैभव रोकडे यांनी शहर पोलिस स्टेशनला दिल्यावरून हैदर अलीसह वरील सर्वांच्या विरोधात गुन्हा रजि.नं.४९३/२०२२ भां.दं.वि.कलम ३०७,३२३,१४३,१४४,१४७,१४८,१४९ म.पो.अधिनियम कलम ३७(१)(३)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली सागर ढिकळे करीत आहेत.

शहरातील टवाळखोर गॅग पुन्हा सक्रिय

शहरातील गुन्हेगारीवर गेल्या काही दिवसांपासून अंकुश बसला होता. बहुतांश गुन्हेगार आणि शहरातील वेगवेगळया टवळाखोर गॅगनचे भाई गॅगने हे शांत होते. मात्र गेल्या चार दिवसांपूर्वीच नगरसेविका पुत्रावर झालेला चॉपर हल्ला चर्चेत असतांनाच काल रात्री पुन्हा एकावर चॉपर हल्ल्याची घटना घडली आहे. तर शहरात किरकोळ मारामार्‍या ह्या नित्यांच्याच झाल्या आहेत. चाळीसगाव शहरात दोन नबंर धंदे पुन्हा सुरु झाल्यामुळेच अशा घटना घडत असल्याची चर्चा शहरात आता रंगू लागली आहे. त्यामुळे चाळीसगाव पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले असून आता वरिष्ठ आधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होवू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com