चाळीसगाव : गावठी कट्ट्यासह एका जण ताब्यात

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
चाळीसगाव : गावठी कट्ट्यासह एका जण ताब्यात

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील वाघळी गावात जुन्या चांभार्डी रस्त्यालगत बेघर वस्तीमधून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एकास गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस सह ताब्यात घेतले आहे. हि कारवाई दि. ४ रोजी करण्यात आली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील वाघळी गावात जुन्या चांभार्डी रस्त्यावगत झोपडीमध्ये आकाश अमृत शिरसाठ (२८) यांच्याकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली, त्या अनुषंनाने पोना. गोवर्धन बोरसे, नितीन आमोदकर, शांताराम पवार, दत्रातय महाजन, जयंत सपकाळे अशांनी गावात जाऊन आकाशाल ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यात बेकादेशिररित्या गावठी कट्टा (गावठी बनावटीचे पिस्तूल ) मॅगझीन (Magazine) सह तीन जिवंत काडतूस असा एकूण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकाश अमृत शिरसाठ यांच्या विरोधात गुुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पो.नि.संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.