चाळीसगाव : कन्नड घाटाच्या निर्मितीपासूनचे म्हसोंबा मंदिर हलविले

वाहतुकीस अडथळा ठरत असल्याच्या कारणाने घेतला निर्णय
चाळीसगाव : कन्नड घाटाच्या निर्मितीपासूनचे म्हसोंबा मंदिर हलविले

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कन्नड घाटाची (Kannada Ghat) निर्मिती झाल्यापासून चाळीसगाव ते कन्नड घाटातील मार्गावर मध्यभागी असलेले म्हसोबा मंदिर (Mhasoba Temple) वाहतुकीस सतत अडथळे ठरत असल्यामुळे घाटातील मोकळ्याजागी हलविण्यात आले आहे. अन्यत्र हलविण्यात आलेल्या म्हसोंबा देवाची ठेकेदार राज पून्शी यांनी विधीवत पद्धतीने पूजापाठ करुन, दुसर्‍या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. आता मंदिराच्या शेडचे काम चालू आहे.

चाळीसगाव : कन्नड घाटाच्या निर्मितीपासूनचे म्हसोंबा मंदिर हलविले
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

कन्नड घाटात नेहमीच (Traffic jam) वाहतुकीची कोंडी होत असते, या कोंडीमागे मुख्य कारण म्हसोंबा मंदिर असल्याचे पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे याना वाटल्याने, त्यांनी मंदिर अन्यत्र हलविण्यासंबंधीत राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना पत्र पाठवले होते. त्यानतंर प्रकल्प संचालकाच्या सूचनाने ठेकेदार राज पुन्शी यांनी हे मंदिर इतरत्र हलविल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान घाटाची निर्मिती झाल्यापासून हे मंदिर त्याठिकाणी होते. वाहनधारक (Vehicle owner) व इतर भाविक घाटातून जातानां मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नव्हते. म्हसोंबाचे दर्शन घेतल्यानतंर घाटातील प्रवास सुखकर होत असल्याची मानता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com