चाळीसगाव : दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

चाळीसगाव : दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

ससारच्या सहा जणाविरोधात गुन्हां

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

पुण्यामध्ये घर घेण्यासाठी (take home) माहेरुन (Maher) दहा लाख रुपये (Ten lakhs) आणण्याची मागणी (Demand) करीत ते आणत नाही म्हणून या ना त्या कारणावरुन विवाहितेचा (married woman) शारीरीक आणि मानसिक छळ करणार्‍या (Physical and mental abuse) नवर्‍यासह (husband) सासू, (Mother-in-law,) सासरे (father-in-law) आणि अन्य जणांच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीसांत (city police) एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल (Filed a crime) झाला आहे.

चाळीसगांव येथील सिंधी कॉलनीत राहणारी सोनम भ्र. विनय दुसाने हिचा नासिक येथील विनय प्रकाश दुसाने याचेसोबत विवाह झालेला होता. लग्नानंतर आमचा लग्नात मानपान झाल नाही, यासह माझा पती पुण्यात नोकरीस आहे म्हणून तेथे घर घेण्यासाठी तुझ्या वडीलांकडून दहा लाख रुपये आण अशी मागणी करीत या ना त्या कारणावरुन सदर विवाहितेचा शारीरीक आणि मानसिक छळ हा तिचा पती विनय दुसाने, सासरा प्रकाश नामदेव दुसाने, सासू उषा उर्फ शकुंकला दुसाने, दिर राहुल दुसाने सर्व रा. नाशिक तसेच मावस सासरा रविंद्र गंगाधर विसपूते आणि मावस सासू नंदा विसपूते अशांकडून होत होता.

त्यानंतर सदर विवाहिता ही चाळीसगांवी आई-वडीलांकडे रहाते. या दरम्यान तिने शहर पोलीसांत वरील सहाही जणांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com