Video पाटलीपुत्र एक्सप्रेसचे दोन डबे झाले वेगळे ; अपघात टळला

चालक व गार्डच्या सर्तकतेमुळे अनेकांचे जीव वाचले
Video पाटलीपुत्र एक्सप्रेसचे दोन डबे झाले वेगळे ; अपघात टळला

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

लोकमान्य टिळक पाटलीपुत्र डाऊन(१२१४१) एक्सप्रेस (Lokmanya Tilak Patliputra Express) कुर्लाहुन पाटीलपुत्रकडे जात असताना चाळीसगाव-वाघळी दरम्यान खरजई रेल्वेगेट जवळ चालत्या ट्रेनची अचानक कपलींग तुटल्याने ट्रेनचे दोन डबे एकमेकांपासून वेगळे झाले.

ही बाबा ट्रेनचे चालक व गार्डच्या लक्षात आल्याने, त्यांनीतातडीने ट्रेन थांबवली व त्यांची माहिती चाळीसगाव रेल्वेस्थानवरील आधिकार्‍यांना दिली. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली. माहिती मिळालताच चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील आपतकालीन रेल्वेची टीम घटनास्थळी दाखल झाली, त्यांनी शर्तची पर्यत्न करुन ट्रेनची कपलींगची दुरुस्त करुन ट्रेन मार्गस्थ केली. यासाठी इंजीनियर योगेश थोरात व स्टेशन मास्टर बडगुजर यांच्या निरिक्षणात ट्रेनचे गार्ड मनोज कनोजिया, पॉइंट्स मैन बालू मोरे, श्री परदेशी, टेक्नीशियन शरद सरदार, नीलेश मंडोळे, संतोष डोंगरे यांच्यासह इंजीनियर योगेश थोरात व त्यांचा स्टाफ, यात्री सुरक्षेच्या दुष्ट्रीकोनातून भुसावल पर्यन्त ट्रेन अकम्पलीग गेले. ट्रेनची कपलिंग तुटल्यामुळे मात्र गाडी अर्धातास उशिरा धावत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com