चाळीसगाव : पाटणा अभयारण्यातील खूनाचा तपास लागता-लागे ना !

ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दित अवैध धंद्याना ऊत
चाळीसगाव : पाटणा अभयारण्यातील खूनाचा तपास लागता-लागे ना !

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पाटणा अभयारण्यात गुरे चारण्यासाठी गेलेला गणेशपुर येथील नाना संतोष पाटील(५०) यांचा हातपाय बाधून, त्याच्या डोेक्यात तिष्ण हत्यार टाकून, खून झाल्याची घटना दि,७ ऑक्टोंबर २०२१ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हां दाखल करण्यात आले. खूनाच्या घटनेला महिना झाला, तरी देखील आरोंपीला चाळीसगाव ग्रामीण पोलीस पकडू शकले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हाद्दित अवैद्य धंदे जोरदार सुरु असल्यामुळे पोलिसांना मारेकर्‍याचा शोध घेण्यास वेळ मिळत नसल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आता वरिष्ठानी लक्ष घालून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेले दोन नबंर धंदे त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील गणेशपुर येथील नाना संतोष पाटील(५०) हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जनावरे चारण्यासाठी पाटणा जंगलात जात होते. ते काही दिवस तेथे वास्तव्यास असायचा. मागली महिन्यात दि,७ ऑक्टोंबर २०२१ रोजी त्यांचा मृतदेह पाटणा जंगलात आढळुन आला. नाना पाटील यांचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मिळुन आला. तसेच त्यांच्या डोक्यात तीष्ण हत्यार मारल्याच्या देखील खूना दिसल्या होत्या. यावरुन नाना पाटील यांचा खून झाल्याचा स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मुलगा निलेश पाटील यांच्या फिर्यांदीवरुन अज्ञात इसमाचा विरोधात खूनांचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे. या गुन्हांचा तपास पीएसआय ठेंगे हे करीत आहेत. मारेकर्‍याला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके पाठवली होती. परंतू पथके गेल्या पायी वापस आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच खूना संबंधीत कुठलाही सुगावा अज्ञाप पोलिसांच्या हाती लागला नसल्याची चर्चा आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हादित अवैद्य धंद्याना ऊत

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या हाद्दीत बंद असलेले दोन नबंर धंद्यावाल्यानी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हाद्दीत आपला दोन नबंरचा संसार थाटल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आधिकार्‍यांचा खिसा चांगलाच गरम होत आहे. एक कर्मचारी दरमहिन्याला आर्थिक ‘ शांती ’ साठी त्याकडे ‘पावर’ दाखवून ठारविक रक्कम जमा करत असल्याची चर्चा दोन नबंरवाल्यामध्ये आहे. त्यामुळे लोकप्रतिनी व वरिष्ठानी लक्ष घालून खूनाच्या गुन्हासह इतर गुन्हांचा उलगडा करण्यासाठी सक्षम आधिकार्‍याची नेमणूक करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com