Video मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

चाळीसगाव : मेहुणबारे आश्रम शाळेचा अभिनव उपक्रम
Video मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील मेहुणबारे येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा (Ashram School) मेहूणबारे या शाळेने एक अभिनव उपक्रम राबवला, या उपक्रमांतर्गत (marithi) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भारताचे (President) राष्ट्रपती यांना पत्र लिखाणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमा अंतर्गत इयत्ता सातवी ते बारावीच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात पत्र लेखन केले ज्याद्वारे मराठी भाषेची महानता विशद करण्यात आली तसेच मराठी भाषेच्या योगदानाविषयी सुंदर मजकूर लिहून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी माननीय राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वैभव ईश्वरलाल चौधरी यांच्यासह सचिन बर्डे , भूषण पाटील, संदीप मराठे, विश्वास चौधरी, दिगंबर कुलकर्णी आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com