चाळीसगाव : शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार

७० कोंटीचे अनुदान प्राप्त, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
चाळीसगाव : शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon / प्रतिनिधी

तालुक्यात दोन महापुर (Floods) व अतिवृष्टीमुळे (heavy rains) शेतकर्‍यांच्या (farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले होते. नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनातर्फे (government) आर्थिक मदसाठी ७० कोंटीचे अनुदान (Grants) येथील महसूल प्रशासनास प्राप्त झाले असून ते उद्यापासून थेट शेतकर्‍यांच्या बॅक खात्यावर टप्या-टप्याने जमा होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी थोडीफार तरी गोड होणार आहे.

तालुक्यात ३१ ऑगस्ट, ७ सप्टेंबर, २७ व २८ सप्टेंबर २०२१ रोजी महापूर व अतिवृष्टीमुळे तब्बल ८४ हजार ४८६ हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले होते. यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले होते. हाता-तोंडाशी आलेला घास आसमानी संकाटामुळे वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. नूकसानग्रस्त भागांचे आमदार मंगेश चव्हाण लोगापाठ दौरे करुन, शासकिय मदतीसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुराव केला होता.

तसेच महसूल प्रशासनास पंचनाम्या संदर्भात सूचना देखील केल्या होत्या. त्या अनुषंगाने चाळीसगव महसूल प्रशसनातर्फे नूकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन, आर्थिक मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडून ७० कोंटीच अनुदान येथील महसूल प्रशानास प्राप्त झाले असून मंगळवार पासून अनुदान थेट शेतकर्‍यांच्या बॅक खात्यांवर जमा होणार आहे.

७० कोटी हे फक्त ७५ टक्के अनुदान आले असून उर्वरित २५ टक्के रक्कम लवकरच शासनाकडून प्राप्त होणार असल्याची माहिती प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर व तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे. ऐन दिवाळीत अनुदान प्राप्त झाल्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी थोडीफार तरी गोड होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com