चाळीसगाव: वीरसावकर चौकातील अतिक्रमण हटवले

शहरातील इतर अतिक्रमण पालिका कधी काढणार ?
चाळीसगाव: वीरसावकर चौकातील अतिक्रमण हटवले

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

शहरातील पोलिस ठाण्याच्या समोरील वीरसावकर चौकातील (Veersavkar Chowk) गेल्या अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण(Encroachment) चाळीसगाव पोलीस (Police) व पालिका प्रशासन (municipal administration) यांनी सयुक्तरित्या राबविलेल्या मोहिमेत रविवारी हटविण्यात (removed) आलेे.

वीरसावकर चौकातील अतिक्रमण हटविल्यामुळे पोलीस प्रशासनानचे खास करुन, नूतन पोलीस निरिक्षक यांचे कौतूक होत आहे. चाळीसगावला खमक्या पोलीस आधिकारी मिळाला असल्याची प्रतिक्रया उमटत असून शहरातील इतर ठिकाणाचे देखील अतिक्रमण हटविण्याची मागणी आता जोर धरत आहे.

चाळीसगाव शहरतील मुख्य चौका पैकी एक वीर सावरकर चौक आहे. तहसील, शहर पोलिस ठाणे, पंचायत समिती, भूमि अभिलेख, तलाठी अशी विविध कार्यालये, बँकांसह अन्य कार्यालये व दुकाने येथे आहेत. त्यामुळे येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. गेल्या अनेक वर्षांपासून येथे पाणपोई व इतर लहान-मोठ्या टपर्‍याचे अतिक्रमण झालेले होते. या अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होता होती. अनेकवेळा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वता; गाडीतून उतरुण वाहतुकीची कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला होता.

अनेक वर्षांपासून असलेले हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन धजावत नव्हते. परंतू गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वीच आलेले शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनी पालिकेच्या सहकार्याने अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार रविवार संकाळपासून जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यास सुरूवात झाली.

काही तासातच येथे बंद पाणपोई, दुकानदारांनी उभारलेले पत्र्याचे शेड तसेच छोट्यामोठ्या अनेक टपर्‍यांचे अतिक्रमण हटवले. अतिक्रमण हटविल्यामुळे वीरसावकर चौकाने मोकला श्‍वास घेतला असून आता या चौकांचे सुशोभिकरण होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहरातली इतर ठिकाणचे अतिक्रमण कधी हटविणार-

शहरातील अतिक्रमण काढणे ही प्रमुख जबाबदारी नगरपालीकेच्या अतिक्रमण विभागाची आहे. मात्र नगरपालीकेला आधीच मुख्याधिकार्‍यांअभावी घर घर लागलेली आणि त्यातून शहराची झालेली दयनिय अवस्था शहरवासीयांनी अनुभवली आहे. नूतन पोलिस निरिक्षकांच्या नेतृत्वात येथील पोलीस स्टेशनबाहेर चौकात आणि मागील बाजूस गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरच अतिक्रमण करुन थाटलेली दुकाने आणि ज्या दुकानांचे पुढील भाग रस्त्यावर आले होते अशी काही अतिक्रमण हटले आहे. आता शहरातील अन्य ठिकाणच्या अतिक्रमण पालिका प्रशासन कधी हटविणार असा प्रश्‍न शहवासियांकडून उपस्थित केला जावू लागल आहे. चाळीसगाव अनेक राजकिय पुढार्‍यांनी व त्यांच्या चेल्यापेल्यानी अनेक ठिकाणी अतिक्रमण करुन ठेवले आहे. त्यामुळे पोलिस व पालिका प्रशासनाने इतर ठिकाणच्या अतिक्रमण देखील त्वरित हटवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.