चाळीसगाव : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

दरेगाव येथील घटना
चाळीसगाव : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील दरेगाव येथे शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाला विद्युत मोटारचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हि घटना दि,१२ रोजी घडली असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोेमनाथ अशोक जाधव(२५) हा दि,१२ रोजी दरेगाव शिवारातील उद्यभान गोवींद पाटील यांच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेल्या असता, त्याला विद्युत मोटारचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला सचिन अशोक जाधव यांच्या फिर्यादीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com