चाळीसगाव एज्यु.सोसा.निवडणुकीसाठी तीनही पॅनलाचा स्वतंत्र जाहिरनामा नाहीच

निवडणुक अवघ्या सहा दिवसांवर, १३ रोजी मतदान, मागील जाहिरनाम्यातील शंभर टक्के वचनपूर्ती नाहिच?
चाळीसगाव एज्यु.सोसा.निवडणुकीसाठी तीनही पॅनलाचा स्वतंत्र जाहिरनामा नाहीच

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या (Chalisgaon Education Society) निवडणुकीसाठी (election) १३ रोजी मतदान होत आहे. यासाठी मतदान (voting) प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. परंतू अद्याप निवडणुकीत उतरलेल्या तीनही पॅनलतर्फे स्वतंत्र जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. एक पॅनलतर्फे पत्रकारांना पूर्वकल्पना न देता पत्रकारपरिषदेत घाईगरबडीत एका पुस्तीकेचे प्रकाशन करुन घेतले. परंतू मागील पाच वर्षांपूर्वी दिलेल्या जाहिरनाम्यातील शंभर टक्के ‘ वचनपूर्ती ’ न झाल्यामुळे संस्थेला डोनेशन दिलेले दाते, सभासद व शिक्षकांमधून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता सहा दिवसात तीन पॅनलमधून कोण कशा प्रकाराचा जाहिरनामा प्रसिद्ध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चाळीसगाव एज्यु.सोसा.निवडणुकीसाठी तीनही पॅनलाचा स्वतंत्र जाहिरनामा नाहीच
Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता...

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मंडळाच्या १६ जागांसाठी १३ रोजी मतदान होत आहे. यासाठी ३४ उमेदरवार रिंगणात उतरलेले आहे. प्रामुख्याने या निवडणुकीत तीन पॅनल मैदातान उतरलेले असून दोन पॅनलमध्ये चुरस आहे. दोन्ही गटातून पत्रकार परिषदेतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍या झाटल्या जात आहे. परंतू एकाही पॅनलने अद्याप निवडणुकीचा स्वतंत्र जाहिरनामा प्रसिद्ध केलेला नाही. आम्ही संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या हितासाठी निवडुन आल्यावर हे ‘ ठोस ’कार्य करु असे एकाही पॅनलने आतापर्यंत स्वतंत्र जाहिरनाम्यातून सांगण्यात आलेले नाही. फक्त पत्रक व बॅनर बाजीतून आम्ही हे करुन ते करु सांगण्यात येत आहे. आता निवडणुकीसाठी अवघे सहा दिवस उरले असून सभासद व शिक्षण क्षेत्रातील मंडळी जाहिरनाम्याची वाट पाहत आहे.

शंभर टक्के वचनपूर्ती नाहिच?

शनिवारी एका पॅनलतर्फे पत्रपरिषदेत घेण्यात आली. त्यात पत्रकारांना पूर्वकल्पना न देता घाई-घाईत वचनपूर्ती या छोट्याखानी पुस्तीचे प्रकाशन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. परंतू मागील पाच वर्षांपूर्वी दिलेल्या जाहिरनाम्यातील शंभर टक्के ‘ वचनपूर्ती ’ न झाल्यामुळे विरोधकांसह, सभासद व शिक्षकांमधून अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या पुस्तीकेत संस्थेच्या सभासद, शिक्षक , प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, विद्यापीठातील एकाखाद्या तज्ञ प्राध्यापकांचे संस्थेच्या प्रगतीबाबत मागोगत व्यक्त केलेले दिसून येत नाही. त्यामुळे फक्त उद्घाटनाचे फोटो छापून संस्थेची प्रगती झाली असे कस मानता येईल. एखाद्या मर्जीतील ‘ झिरो पत्रकाराने ’ तयार करुन दिलेल्या पुस्तीकेप्रमाणे ही पुस्तीका दिसत असल्याचे विरोधकांकडून बोलले जात असून यावर अनेक प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

आम्ही येत्या गुरुवारी(दि,१०)विद्यार्थी, पालक व शिक्षक केंद्री व संस्थेच्या हिताच्या दृष्टीकोनातून पुढील पाच वर्षांसाठी काय करता येईल. असा सर्वसमावेश स्वतंत्र जाहिरनामा प्रकाशीत करणार आहोत.

डॉ.विनोद कोतकर, परिवर्तन पॅनल

संस्थेच्या हिताच्या दृष्टीकोनातून आम्ही एक पुस्तीका प्रकाशीत केलेली आहे. त्यात आम्ही आमचा पुढील पाच वर्षांसाठीचा संकल्प व्यक्त केला आहे. स्वतंत्र जाहिरनामा अद्याप प्रसिद्ध केलेला नाही.

प्रा.डॉ.मिलींद बिल्दीकर, प्रगती पॅनल

आम्ही संस्थेच्या हितासाठी सोसायटी बचवा पॅनलच्या माध्यामातून या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरलो आहोत. आम्ही सभासदांच्या घरोघारी जावून संस्थेच्या हिताबाबत आम्ही काय करणार आहोत. याबाबत पत्रक वाटप करीत आहोत. आणि तोच आमच्या जाहिरनामा आहे. सत्ताधारी आमच्याच जाहिरनाम्याची कॉफी करीत आहेत.

सी.सी.वाणी सर, सोसायटी बचवा पॅनल

चाळीसगाव एज्यु.सोसा.निवडणुकीसाठी तीनही पॅनलाचा स्वतंत्र जाहिरनामा नाहीच
Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com