चाळीसगाव एज्यु.सो.च्या निवडणुकीसाठी ११ बोकड्यांचा बळी, एक खोक्याचा खर्च ?

शंभर वर्षांच्या पवित्र संस्थेत गलिच्छ राजकारण
चाळीसगाव एज्यु.सो.च्या निवडणुकीसाठी ११ बोकड्यांचा बळी, एक खोक्याचा खर्च ?

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

महाराष्ट्राताच्या (maharastra) राजकारणात सत्तांतर झाल्यापासून गेल्या काही महिन्यांपासून खोक्याची व बोक्याची चर्चा सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण होत असल्याचे सिध्द झाले आहे. चाळीसगाव येथे देखील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतांसाठी गलिच्छ राजकारण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत तालुक्यातील व इतर तालुक्यातील मतदारांच्या मेजवाणीसाठी जवळपास ११ बोकट्यांचा बळी व निवडुकीसाठी एक खोकाभर खर्च झाल्याची चर्चा आता निवडणुकीनतंर तालुकाभर होवू लागली आहे. यात काय खेरे आणि काय खोटे हे भविष्यात सिध्द होणारच आहे. परंतू शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र संस्थेत केवळ आपल्या उमेदवरांच्या ‘ प्रगतीसाठी ’ असे उद्योग करणे अत्यंत चुकीचे असून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे आहेत.

चाळीसगाव एज्यु.सो.च्या निवडणुकीसाठी ११ बोकड्यांचा बळी, एक खोक्याचा खर्च ?
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

चाळीसगाव एज्युकेशन सोसायसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.१३ नोव्हेंबर रेाजी मतदान झाले, व दि,१४ रोजी अपेक्षाप्रमाणे निकाल लागला. या निवडणूकीसाठी ८५१० मतदारांपैकी ५४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चाळीसगांव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक जाहिर झाल्यापासून ती संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय होता. या संस्थेचे तब्बल ८५१० संभासद आहेत. त्यापैकी तालुक्याबाहेर मोठ्या प्रमाणात मतदार सभासद आहेत. या मतदारांनी आपल्या पारड्यात मते टाकवीत, यासाठी त्यांना बाहेगावाहुन आनण्यापासून ते घरी सोडण्यापर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांच्या जेवणासाठी शहरातील नागदरोडस्थित एका हॉटेलमध्ये ‘ गवतावर ’ बसून पोटभर जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आल्याचे बालेले जात आहे. यासाठी खास ११ बोकट्याचा बळी देण्यात आला. तर तालुक्यासह बाहेरगावच्या मतदारांना तीन ते पाच हजारांचे जड वजणाचे पॉकिट देखील देण्यात आले होते. या निवडणुकीत एक पॅनलनेच हा खोकाभर खर्च केल्याची चर्चा आहे. निवडणुकीत आपल्या पॅनलच्या प्रगतीसाठी तब्बल एक खोक्याच्या जवळपास खर्च केल्याचा आकडा आता बाहेर येवू लागला असून शिक्षण भरती व संस्थेच्या इतर कमाईचा हा काळा पैसा असल्याचे देखील शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जे समाजात समाजकारण चेहरा घेवून फिरत होते. त्यांचा देखील बुरखा यानिमित्ताने फाटला असून समाजकारणाच्या आडुन आर्थिक फायद्यासाठी फक्त राजकारण करीत असल्याचे बोलले जावू लागले आहे. त्यामुळे भविष्यात आता पुढील पाच वर्षात हे संस्थेच्या प्रगतीसाठी काम करतात की स्वता;च्या आर्थिक प्रगतीसाठी काम करतात याकडे शिक्षण क्षेत्रातील जाणकार आता बारीक लक्ष ठेवणार आहेत, यात दुमात्र शंका नाही.

चाळीसगाव एज्यु.सो.च्या निवडणुकीसाठी ११ बोकड्यांचा बळी, एक खोक्याचा खर्च ?
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

जिंकणार्‍यांपेक्षा हरणार्‍यांची जास्त चर्चा

चाळीसगाव एज्युकेशन सोसायसाठीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी उमेदवारांपेक्षा पराभूत झालेल्या उमेदवारांची जास्त चर्चा तालुकाभर व शिक्षण क्षेत्रात होत आहे. खासकरुन एका विशिष्ट समाजाने टाकलेल्या एकगठ्ठा मतांवर सर्व जण आश्‍चर्य व्यक्त करीत असून त्यांच्या एकीचे बळ शिक्षण क्षेत्रातनिमित्ताने संपूर्ण तालुक्याला दिसले आहे. त्यांचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका पराभूत उमेदवाराला देखील त्यांनी मतांचे भरभरून दाण दिले आहे. तर काही पराभूत उमेदवारांमुळेच सत्ताधार्‍यांचे विजयाचे गणित जुळल्याची चर्चा आहे. चर्चेतील पराभूत उमेदवार म. सो. बाविस्कर (२८६८), प्रशांत पाटील (२६३८), डी.आर.चौधरी (२४८२), राखुडे (२४२८), राजेंद्र चौधरी (२३९६), जुगल अग्रवाल (२१३४), प्रा.मिलींद बिल्दीकर (२००५), सुरेश हरदास चौधरी (२०३८), वर्धमान धाडीवाल (२०१०), सुधीर पाटील (१९६३), महेंद्र पाटील (१७६६), सी.सी.वाणी सर( ७५७), संदीप जैन (७४६), विजय शर्मा (६४०).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com