चाळीसगाव एज्युकेशन सोसा. पुन्हा प्रगतीला संधी

प्रगती १४ तर परिवर्तन पॅनलाचा ४ जागांवर विजय, सचिवपद गमावल्यामुळे सत्ताधार्‍यांचे चेहरे पडले
चाळीसगाव एज्युकेशन सोसा. पुन्हा प्रगतीला संधी

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी-

चाळीसगांव एज्यूकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अपेक्षा प्रमाणे लागला. या निवडणूकीत संस्थेचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांचे प्रगती पॅनल व संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर व संचालक डॉ.सुनिल राजपूत यांच्या परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत झाली, यात प्रगती पॅनलने (Pragati panel)बाजी मारत अध्यक्ष. उपाध्यक्षासह १४ जागांवर विजय प्राप्त केला. तर परिवर्तन पॅनलला महत्वाचे सचिवापदासह ४ जागांवर विजयी झालेत. संस्थेचे महत्वाच्या पदावर विरोधी परिवर्तन पॅनलाचे उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांचा विजय झाल्यामुळे विरोधकांचे चेहरे पडल्याचे दिसून आले. तर माजी उमेदवारांना सभासद मतदारांनी घराचा रस्ता दाखवल्यामुळे विविध चर्चांना उत आला होता.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल दि.१३ नोव्हेंबर रेाजी मतदान झाले. या निवडणूकीसाठी ८५१० मतदारांपैकी ५४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी ६४.०७ झाले होत. आज संकाळपासून चाळीसगाव महाविद्यालयात मतमोजणी सुरू झाली होती. प्रथम अध्यक्षपदाची मतमोजणी करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी प्रगती पॅनलतर्फे आर.सी.पाटील यांना(२५७८) तर परिवर्तन पॅनल चे के.बी.साळुंखे यांना(१६२०) तर सोसायटी बचाव चे सी.सी.वाणी सर (९७५)मते मिळाली. तिरंगी लढतीत आर.सी.पाटील विजयी झाले. तर उपाध्यक्षपदाच्या दुरंगी लढतीत मिलींद देशमुख यांना(२७६६) मते मिळाली. तर परिवर्तन पॅनलच्या एकमेव महिला उमेदवार सुचित्रा पाटील यांना(२५८८)मते मिळाली. यात मिलींद देशमुख विजयी झाले.

मात्र सचिव पदासाठी परिवर्तन पॅनलचे डॉ.विनोद कोतकर यांना (२६४६) मते मिळाली तर प्रगतीचे प्राचार्य मिलींद बिल्दींकर यांना(२००५) मते मिळाली ,अरूण पाटील यांना( ५९५)मते मिळाली यात डॉ.विनोद कोतकर यांचा ५०५ मतांनी विजय झाला. सिनीअर पेट्रन गटात प्रगतीचे सुरेश स्वार(३११४) विजयी झाले. त्याच गटात तर परिवर्तन पॅनलचे बाळासाहेब चव्हाण(२७०७) व प्रशांत पाटील यांच्या मतांची फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. परंतू फेरमतमोजणीतही प्रा.बाळासाहेब चव्हाण विजयी झाले. पेट्रन गटात प्रगती पॅनलचे माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी(४१८८) व निलेश छोरिया(३४३२) हे विजयी झाले. तर परिवर्तन पॅनलचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांना (२३९८) मते मिळाली. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सर्वसाधारण गटातून प्रगती पॅनलचे मु.रा. अमृतकार (४२७४) तर क.मा.राजपूत (३६९६)मते मिळवित विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महारू बाविस्कर यांना(१८६८) मते मिळाली.त्यांना पराभव स्वीकारावा लागला. फेलोज गटातून नारायणभाऊ अग्रवाल(३८४७) व योगेश करंकाळ(३९२५) हे विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी जुगलकिशोर अग्रवाल यांचा पराभव झाला. डोनर गटात प्रगती पॅनलचे नाना कुमावत (२८६३) ,जितेंद्र वाणी(२७२०) अशोक वाणी(२५४५), परिवर्तनचे डॉ.सुनिल राजपूत (२५३३) हे विजयी झाले तर पाचव्या जागेसाठी भूषण ब्राम्हकार(२४९४) आणि प्रगतीचे दिलीप चौधरी(२४८४) यांच्या अवघ्या दहा मतांचा फरक असल्याने या जागेवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. फेरमतमोजणीतसही दिलीप चौधीर यांचा पराभव झाला असून भूषण ब्राम्हकार विजयी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सचिवपद गमावल्यामुळे सत्ताधार्‍यांचे चेहरे पडले-

या निवडणूकीत संस्थेचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांचे प्रगती पॅनल व संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. सचिवपदासाठी दोन्ही पॅनलमध्ये चुरस निर्माण झाली होती. परंतू ५०५ मतांनी डॉ.विनोद कोतकर यंानी पुन्हा विजय मिळवल्यानतंर सत्ताधार्‍यांचे चेहरे पडलेे होते. आता पुढील पाच वर्षात संस्थेच्या प्रगतीच्या सर्वात जास्त अपेक्षा सचिव डॉ.विनोद कोतकर यांच्याकडून सभासदांना आहेत.

विजयी उमेदवार -

अध्यक्ष रामकृष्ण चुडामन पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद मुरलीधर कोतकर, सिनियर पेट्रन बाळासाहेब चव्हाण, सिनियर पेट्रन सुरेश रामचंद्र स्वार, पेट्रन निलेश नंदलाल छोरिया, पेट्रन भोजराज प्यारेलाल पुंशी, फेलोज नारायण मांगीलाल अग्रवाल, फेलोज योगेश हिरामण करंकाळ, सर्वसाधारण मुरलीधर रामकृष्ण अमृतकर, सर्वसाधारण कनकसिंग मानसिंग राजपूत, डोनर गटात नानाभाऊ कुमावत, अशोक वाणी, जितेंद्र वाणी, भूषण ब्राह्मणकर, डॉ सुनील राजपूत. तर व्हाईस पेट्रोन गटात आधिच योगेश अग्रवाल, ऍड.प्रदिप आहिरराव हे बिनविरोध झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com