चाळीसगाव एज्यु. सो. अग्रवाल कुटुंबाचा हुकूमशाही कारभार-डॉ.विनोद कोतकर

कायद्यानुसार नव्याने सर्वाना न्याय देणारी निवडणुक घ्यावी, पत्रकार परिषदेत गंभीर आरोप,
चाळीसगाव एज्यु. सो. अग्रवाल कुटुंबाचा हुकूमशाही कारभार-डॉ.विनोद कोतकर

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची (Chalisgaon Education Society) निवडणुक प्रक्रिया घटना आणि निवडणुक (Election) आचारसहिता यांची मोडतोड करुन घेतली जात आहे. सन १९९२ च्या घटनेनतंर तब्बल २३ वर्षानतंरही धर्माआयुक्तांकडे दुदैवाने घटनादुरुस्तीची प्रक्रिया प्रलंबीत आहे. संस्थेत आतापर्यंत केवळ अग्रवाल कुटुंब हेच हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत असून त्यांच्यामुळेच संस्थेची घटनादुरुस्ती झालेली नाही. त्यांनी संस्थेच्या हिताकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रिया रद्द करुन, कायद्यानूसार नव्याने सर्वाना न्याय देणारी निवडणुक घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे मत पत्रपरिषदेत संस्थेचे माजी सचिव डॉ.विनोद कोतकर यांच्यासह पॅनलमधील सदस्यांनी व्यक्त केले.

शहातील करगावरोडस्थित आई हॉस्पीटलमध्ये चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणुकसाठी उभे असलेल्या परिवर्तन पॅनलतर्फे पत्रपरिषदेेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा.बाळासाहेब चव्हाण, डॉ.सुनिलसिंह राजपूत, के.बी.सांळुखे, महेंद्र पाटील, सुधीर पाटील, वर्धमान धाडीवाल, सौ.सुचित्रा पाटील आदि उपस्थित होते.

पुढे माहिती देतांना डॉ.कोतकर म्हणाले की, सन १९९२ च्या घटनानूसार आजही धर्मादायआयुक्तांनाकडे चेअमन म्हणून वा.ग.पूर्णपात्रे व सेक्रटरी म्हणून व्ही.डी.जोशी यांचे नाव आहे. ज्याना आतापर्यंत घटनेनूसार संस्थेच्या कागदोपत्री स्वता;च्या नाव लावता आले नाही. तेच अग्र्रवाल कुटुंब आतापर्यंत संस्थेत हुकशाही पद्धतीने शेकी मिरवत आहे. सन २०१८ पासून आम्ही वेळोवेळी घटना दुरुस्तीसाठी पर्यंत केलेत, तसेच संस्थेच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असता आमचे आधिकार ठराव करुन गोठवण्यात आले. तरी देखील आम्ही माजी विद्यार्थ्याच्या मदतीने संस्थेचे रुपडे पालटण्याचा प्रयत्न केला असून यापुढे देखील संस्थेच्या हितासाठी काम करत राहु. संस्थेच शिक्षक भरतीत देखील मोठ्या प्रमाणात घोेळ झाला आहे. याबाबत देखील आम्हाला आधिकार नसल्यामुळे आम्ही हातबल झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही घटनादुरुस्तीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांचा निर्णय आला असून येत्या सहा महिन्यात त्यावर निर्णय घ्यावयाचा आहे. आता संस्थेच्या हितासाठी नव्याने घटना आणि निवडणुक आचारसहितनूसार निवडणुक प्रक्रिया घ्यावी.

घुसमट होत असल्याने निर्णय घेतला - डॉ.सुनिलसिहं राजपूत

मी संस्थेच्या संचालक मंडळात निवडून आल्यापासून माझे निर्णय विचार घेतले जात नव्हते. मी संस्थेच्या प्रगतीसाठी नव्या कल्पना मांडल्यात, तर काही कल्पानावर प्रत्यक्षात काम करुन त्या आम्लात आणून विद्यार्थ्याचे हित जोपासले. परंतू संस्थेत प्रचंड घोळ असल्यामुळे मी संबंधीताची साथ निवडून आल्यानतंर एक वर्षांनीच सोडली होती. संस्थेच शिक्षक व इतर कर्मचारी भरतीत मोठ्या प्रमाणात घोळ असून याबाबत वेळोवेळी लेखी विरोध केलेला असल्याचे यावेळी डॉ.सुनिलसिहं राजपूत यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com