चाळीसगाव एज्युकेशन सो.निवडणूकीत २७ अर्ज अवैध

तालुकाध्यक्षाचा अर्ज बाद , ९३ उमेदवार रिंगणात, माघारीनतंर निवडणुकीचे चित्र होईल स्पष्ट
चाळीसगाव एज्युकेशन सो.निवडणूकीत २७ अर्ज 
अवैध

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या (Chalisgaon Education So) निवडणुकीसाठी (Election) शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १२३ उमेदवारी (applications) अर्ज दाखल झाले होते. आज (दि.१४) छाननीच्या दिवशी एकाच प्रवर्गात डबलच्या संख्येने भरलेले उमेदवारी अर्ज एकच ठेवून, जास्तीचे अर्ज अवैध (Additional applications invalid) ठरविण्यात आले. तर प्रवर्गात दिनेश साहेबराव पाटील यांचे उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज अवैध (invalid) ठरविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. १२३ पैकी २७ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण ९६ उमेदवार आहेत. आता माघारीची दिनांक १६ ते १८ ऑक्टोबर पर्यंत असल्याने माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर ज्या हवशा, नवशा, गवशांनी अर्ज भरलेले आहेत. ते नक्कीच माघार घेणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीत १८ जागांसाठी मतदानाच्या प्रक्रियेत दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता एकूण १६ जागांसाठी मतदान होणार आहे. आज छाननीच्या दिवशी अध्यक्षपदासाठीच्या दहा अर्जात एक अर्ज बाद झाला. नऊ अर्ज वैध ठरले आहेत. उपाध्यक्ष पदासाठी १२, सचिव गटात १३ वरील तीनही गटात एका जागेसाठी हे उमेदवार आहेत.

तर दोन जागा निवडून देण्यासाठीच्या सीनियर गटात आठ गटात, तीन व्हाईस पॅटर्न गटात, दोन बिनविरोध फिलोज गटात, तीन आणि सर्वसाधारण गटात चार आणि डोनर गटात एकूण पाच उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यात एकूण ४२ असे एकूण ९६ उमेदवार सध्या तरी रिंगणात आहेत आता माघारी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.पंकज देशमुख ॲडवोकेट, ॲड रणजीत पाटील, ॲड. बाविस्कर हे कामकाज पाहत आहेत.

तालुकाध्यक्षाचा अर्ज बाद होणे चर्चेचा विषय-

छानीत १२३ पैकी २७ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण ९६ उमेदवार आहेत. एकाच पदासाठी २६ जणांंनी दोन अर्ज भरल्यामुळे २६ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. तर प्रवर्गात दिनेश साहेबराव पाटील यांचा उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

परंतू दिनेश पाटील हे एका पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. त्यांच्या स्वता : च्या गावात ग्रामपंचायतमध्ये स्वता :चे पॅनल उभे करतात. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, विधानसभा अशा अनेक निवडणुकाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वता : च्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसणे हे संशायस्पद व हास्यास्पद असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. एका तालुकाध्यक्षाचा हातून अशी चूक होवू शकत नसल्याचे देखील बोलले जात असून यामागे राजकिय मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com