झोप लागताच चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास

रेकीवर असलेल्या बुरखाधारी महिला व लहान मुलीचा प्रताप
झोप लागताच चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव रेल्वे स्थानकातील महिलावेटिंग रूम (Women's waiting room)मध्ये हिरकणी कक्षात बसलेल्या प्रवासी महिलाना रात्री प्रवास करून थकल्याने, त्यांना झोपची डुलकी लागली, आणि याचा संधी फायदा घेत, बुरखाधारी व तिच्या सोबत असलेल्या लहान मुलीने काही क्षणात महिलेच्या पर्सवर हात साफ केला.

पर्समध्ये मोबाईल व रोकड असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून महिलेने पोबारा केला. हि घटना दि,२७ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात अज्ञात चोरट्या महिले विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्त माहिती अशी की, दर्शना सागर कोडगीर (वय-२६वर्षे,) रा. संदीप लॉड्री बांबुगल, धुळे. या पती व बहिणी सोबत मुंबई ते चाऴीसगाव असा प्रवास करित दि, २७ रोजी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे चाळीसगाव ते धुळे जाणे करिता रेल्वे प्रवासाचे टिकीट घेऊन गाडीला वेळ असल्याने, बहिणी सोबत सामान घेऊन महिलावेटिंग रूममध्ये ((Women's waiting room)) हिरकणी कक्षात बसल्या होत्या, रात्रीचा प्रवास करून थकल्याने त्यांना झोपची डुलकी लागली. आणि या संधीचा फायदा घेत, त्याच्या सामना सोबत ठेवलेली पर्स आधिच रेकीवर असलेल्या बुरखाधारी महिलाने व तिच्या सोबत असलेल्या १० ते १२ वर्षाच्या लहान मुलीने लंपास केली.

या पर्समध्ये १३ हजार रुपये किमंतीचा सॅमसंग मोबाईल फोन, १६ हजार रुपये किमंतीचा ऑपो प्रो मोबाईल, आणि रोख १० हजार रुपये असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात दर्शना सागर कोडगीर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात महिलेविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉॅ. नागेश दंदी हे करीत आहेत. दरम्यान संशयित आरोपी महिला रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.