चाळीसगाव : शिरसगाव येथे १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार

गरोदर राहिल्याने घटना उघडकीस, पोलिसात गुन्हां दाखल
चाळीसगाव : शिरसगाव येथे १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील शिरसगाव (Shirasgaon) येथे एक १३ वार्षीय बालिकेशी (girl) प्रेमसंबंध(Love affair) निर्माण करुन, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार (Tyranny) केला. बालिका गरोदर राहिल्यानतंर हा प्रकार उघडीस आला. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हां दाखल (Crimes filed) करण्यात आला आहे.

मनोज ऊर्फ सोनू जिभाऊ निकम रा.शिरसगाव याने सवत्सर, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर येथे राहणार्‍या १३ वर्षीय बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण करुन एप्रिल ते मे २०२१ या कालवंधीत तिच्यावर तालुक्यातील शिरसगाव येथे एकाच्या ओट्यावर बळजबरीने अत्याचार केला. बालिका २८ आठवड्यांची गरोदर राहिल्यानतंर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी लोणी ता.कोेपरगांव, जि. अहमदनगर, येथे भादवी कलम ३७६,३७६(२) यासह विविध कलमान्वय गुन्हां दाखल करण्यात आला होता. आता हा गुन्हा मेहुणबारे पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com