चाळीसगाव : तोतया वधूसह एजंट जाळ्यात

लग्नाचे आमिष दाखवून अडीच लाखात तरुणाची केली होती फसवणूक
चाळीसगाव : तोतया वधूसह एजंट जाळ्यात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

तालुक्यातील डांंमरून येथील घनश्याम मुरलीधर पाटील यांंची लग्नाचे आमिष lure of marriage दाखवून 2 लाख 40 हजार रुपये घेऊन तोतया वधू Totaya bride व एजंट Agent रफूचक्कर झाले होते. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला Chalisgaon Rural Police Station गुन्हा दाखल करण्यात आला होता, ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास करत, तोतया वधू व एजंटला बेड्या ठोकल्या shackles hit आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील डांमरूण येथील घनश्याम मुरलीधर याला लग्नाचे आमिष दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करून लग्नासाठी, तोतया वधु आशा संतोष शिंदे (३१) रा. सुंदरवाडी, चिकलठाणा, जिल्हा औरंगाबाद व एजंट किरण भास्कर पाटील(४५) उर्फ बापू पाटील राहणार आमडदे तालुका भडगाव यांनी कट रचुन घनश्याम पाटील यांच्याकडून २ लाख रुपय व ४० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने घेतले होते, परंतु लग्न लावण्यापूर्वी दोघांनी 2 लाख 40 हजारांचा ऐवज घेवुन पोबारा केला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला घनश्याम मुरलीधर पाटील यांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांच्या आदेशाने तपासी अंमलदार पोहे का विजय महादू शिंदे यांनी गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत, तब्बल महिनाभरानंतर तोतया वधू व एजंट दोघांनाही दि,१ रोजी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना दिनांक 2 रोजी न्यायालयात हजर केले असता, दिनांक ६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनी अजून किती जणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे, याचा तपास लागण्याची शक्यता आहे.

अविवाहित तरुणांनो सावधान-

सध्या लग्नाच्या समस्या उद्भवत असल्याने अविवाहित तरुणांना हेरून, त्यांची माहिती काढून अनेक टोळ्या त्यांची लग्नासाठी फसवणूक करण्यासाठी कार्यरत आहेत. लग्ना सबंधित खातरजमा करूनच संबंध करावयाचा आहे. तसेच आशा टोळीबाबत संशय आल्यास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पो. निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com