चाळीसगाव : दोन वर्षांच्या ब्रेक नतंर बेलगंगा उद्या सुरु होणार

गळीत हंगाम शुभारंभानिमित्त उद्या गव्हाण पूजन
चाळीसगाव : दोन वर्षांच्या ब्रेक नतंर बेलगंगा उद्या सुरु होणार

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना (Belganga Cooperative Sugar Factory ) पंधरा वर्षे बंद होता. त्यानतंर भूमीपूत्रांच्या चळवळीनतंर व चेअमरन चित्रसेन पाटील यांच्या पुढाकाराने कारखाना अंबाजी ट्रेडींग कंपनीने विकत घेवून, तो सन २०१८-१९ मध्ये ट्रायल हंगामासाठी सुरु केला होता. परंतू त्यानतंर सन १९-२० ला दुष्काळ असल्याने आणि २०-२१ ला कोरोनाच्या संकटामुळे करराखाना बंद होता.

ट्रायल सिझनमध्ये ज्या अडचणी आल्या होत्या, त्याची मेंटेनन्सीच कामे यंदाच्या अक्षयतृतीयेलाच सुरू केली होती, नवरात्रात पहिल्याच माळेला बॉयलर-प्रदीपनाचा कार्यक्रमही झाला. उद्या दिनांक २४/१०/२०२१ रविवार संकाळी १० वाजता बेलगंगा साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभानिमित्त गव्हाण पूजन करून मोळी टाकायचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तब्बल दोन वर्षांच्या ब्रेक नतंर कारखाना पुन्हा सुरु होणार असल्यामुळे कारखान्या संदर्भात उठलेल्या उलट-सुलट चर्चा व अफवा आता थांबणार असून कारखाना नियमित सुरु राहिल का ? याकडे देखील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com