Video चाळीसगाव : अग्निशमन गाडी मोजतेय शेवटच्या घटका

नगरपरीषदेकडे आग विझविण्यासाठी एकच गाडी, सत्ताधारी व विरोधकांनी पाच वर्षात केले तरी काय?
Video चाळीसगाव : अग्निशमन गाडी मोजतेय शेवटच्या घटका

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

जळगाव (jalgaon) जिल्ह्यात सर्वाधीत मोठा विस्तार असलेल्या तालुका (taluka) चाळीसगाव आहे. शहरसह तालुक्याची लोखसंख्या साडेतीन लाखांच्या पुढे आहे. एवढ्या मोठ्या विस्तार असलेल्या शहरासह तालुक्यासाठी (Fire) आग विझविण्यासाठी एकच अग्निशमनची गाडी (Fire department) असून ती देखील शेवटची घटका मोजत असल्याची बाब समोर आली आहे. कालच शहरातील सुवर्णाताई नगरात एका झोपडीला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशमनची गाडी रस्त्यातच बंद पडल्यामुळे या गाडीला (Tractor) ट्रॅक्टरचे टोचन करीत धक्का मारुन आणावे लागले. याबाबत चित्रण (Social media) सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानतंर गेल्या पाच वर्षात सत्ताधारी व विरोधकांनी काय काम केले ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

चाळीसगांव नगरपरीषदेकडे (Municipal Council) शहरात व तालुक्यातील १११ खेड्यांमध्ये आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी अवघी एकच अग्निशमनची गाडी आहे. आणि तिचे देखील पंचवीस वर्षे वय झालेली आहे. प्राप्त माहिती नुसार पंधरा वर्षांनंतर अशी गाडी स्कॅप होते. मात्र गेल्या पंचवीस वर्षापूर्वीची ही गाडी कशी बशी शेवटच्या घटका मोजत, आग विझवण्यासाठी रस्त्यावर धावत आहे. कालच शहरातील सुवर्णाताई नगरात एका झोपडीला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या या गाडीचा गॅसरॉड तुटल्याने तिला ट्रॅक्टरव्दारे टोचण करुन, गॅरेजपर्यंत आनले. याचे चित्रण सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानतंर शहरातील अग्नीसुरक्षा वार्‍यावर असल्याची बाब पुढे आली आहे.

चाळीसगाव तालुक्याची लोकसंख्या साडेतीन लाखांच्यावर असून १११ खेड्यांचा विस्तार आहे. इतका मोठ्या तालुक्यात आग विझवण्यासाठी ही एकमेव अग्निशमनची गाडी न. पा. कडे असतांना शेजारील तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोठेही मोठ्या स्वरुपाची आग लागल्यास जेथे ही मदतीसाठी अशा अग्निशमनच्या गाड्या पाठवल्या जातात अशा परिस्थतीत चाळीसगांव नगरपालीकेची एकमेव अग्निशमनची गाडी जर बाहेर अन्यत्र तालुक्यात वा जिल्ह्यात गेली आणि त्याचवेळी जर चाळीसगांव शहरात किंवा तालुक्यात आगीची घटना घडली तर परीस्थिती काय होवू शकते याची कल्पना न केलेलीच बरी, तर दुसर्‍या गाडीला ४० ते ५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे ती फेल होवून न.पा.च्या गॅरेजमध्ये मरणासन्न अवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून उभी आहे.

चाळीसगाव नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांनी गेली पाच वर्ष फक्त एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत. शहरातील मुलभूत सुविधांकडे मात्र साफ दुर्लक्ष केलेले दिसत आहे. पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार यावरील राजकरणातून आपले स्वता;चे ‘ अर्थकारण ’ मात्र सुव्यवस्थीत करुन घेतल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. परंतू नागरिकांच्या सुरक्षेसाठी कुठल्याही ठोस उपाय-योजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येणार्‍या न.पा.च्या निवडणुकीत शहराच्या सुरक्षेसाठी काय केले याचा जाब नक्कीच सत्ताधारी व विरोधकांना द्यावा लागणार आहे. आता नगरपरीषदेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. प्रशासकांनी या गंभीर स्वरुपाच्या गोष्टीकडे लक्ष देवून पंचवीस वर्षापासून गावात अग्नीसुरक्षा करणार्या या फायर गाडीला पर्याय नव्या फायर वाहनासाठी तरतूद करावी अशी अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com