मंतीमंद महिलेला मारहार करुन अत्याचार

मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल
मंतीमंद महिलेला मारहार करुन अत्याचार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील मेहूणबारे पोलिस स्टेशन (Mehunbare Police Station) हद्दीतील कुंझर शिवारातील तलावाजवळ २५ वर्षीय मुकबधिर महिलेला मोटर सायकलहून आलेल्या तिघांनी मारहाण करुन, त्यातील एकाने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याकरणी मेहुणबारे पोलीस (police) स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिला ही अदिवासी समाजातील आहे. दहा वर्षापूर्वी तिच्या पतीने ती मुकबधिर असल्याने तिला घराबाहेर काढले तेव्हापासून ती कुंझर ता.चाळीसगांव येथे राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. कुंझर गावाच्या तलावाजवळ तिला दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी डोळयाजवळ मारहाण केल्याचे दिसून येत आहे. मारहाणीमुळे तिचे डोळे सुजलेले आणि डोळयातून रक्तस्त्राव दिसून आला तर तिच्या अंगावरील कपडे देखील कुंझर गावातील तलावाजवळ आढळून आले. तिघांपैकी एक आरोपीन तिच्यावर अतिप्रंसग केल्याचे तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

भावाच्या फिर्यादीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला ही मतिमंद असली तरी तिच्यावर अतिप्रंसग आणि मारहाण करणार्‍यांना ती ओळखेल असे ती खूणावून सांगत असल्याने पोलिस या तिघांचा कसून शोध घेत आहे. दरम्यान ग्रामीण भागात आशा घटनामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com