मेहुणबारे गुटखाप्रकरणी एपीआयसह 7 पोलीस निलंबित

मेहुणबारे गुटखाप्रकरणी एपीआयसह 7 पोलीस निलंबित

जळगाव - Jalgaon :

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पकडलेल्या गुटखा प्रकरणात एपीआयसह स्थानिक गुन्हे शाखेच्या सात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे

पोलीस खात्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी तर सरळसरळ पोलिसांवरच आरोप करीत गुटखामाफियांना पोलिसांचा वरदहस्त असल्याचे म्हटले होते, त्यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते.

गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यात तब्बल सुमारे 50 लाखांहून अधिक असलेला गुटखा पोलिसांनी हस्तगत केला होता.

यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील मेहुणबारे येथे पकडलेला ट्रक जळगावात नेण्याऐवजी मेहुणबारे पोलिसात का नेण्यात आला नाही ? यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता.

या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी चौकशी करून तब्बल 8 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. यात मेहुणबारेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे 7 कर्मचारी यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com