भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने कमावले 391.43 कोटी

भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने कमावले 391.43 कोटी
रेल्वे

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रेल्वेची देशभरातील प्रवासी वाहतूक जवळपास ठप्प असल्यात जमा होती. त्यामुळे रेल्वेला प्रवासी वाहतुकीसाठी मिळणारे मोठे उत्पन्न बुडाले आहे. मात्र, याच काळात रेल्वेने Railways भंगारात rubble काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले आहे. 2020-21 या वर्षात भारतीय रेल्वेने भंगार विक्रीतून 391.43 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या 15 वर्षात ही भंगार विक्रीतून झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे.

मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने झिरो स्क्रॅप मिशन सुरू केले आहे. रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिनं, त्याचे डब्बे अशा गोष्टींचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे.

त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्याप्रमाणावर भंगार निघते. भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. कोविड-19 महामारी असूनही मध्य रेल्वेने 2020-21 या वर्षात 350 कोटी रुपयांचे स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ओलांडले. आणि 391.43 कोटी रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या 15 वर्षातील सर्वाधिक आहे. रेल्वे खात्याने 2021-22 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 400 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

भंगार विक्रीतून महसूल वाढ

मध्य रेल्वेने 8.65 कोटी रुपयांच्या कमाईसह ई -ऑक्शनद्वारे जसे आहे तिथे आहे तत्वावर वापरात नसलेल्या संरचनांची विल्हेवाट लावली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही, तर यामुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. ते म्हणाले की, रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल.

या आर्थिक वर्षात, रेल्वे लाभार्थ्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजन जनरेटर प्लांटसह कोविड वस्तूंच्या खरेदीची व्यवस्था करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com