Photos # चौगाव गडावर दिपोत्सव साजरा

Photos # चौगाव गडावर  दिपोत्सव साजरा

लासुर Lasur ता.चोपडा (वार्ताहर)

दिवाळी निमित्ताने (occasion of Diwali) "एक दिवा राजेंच्या गडकिल्ल्यांना (A lamp to the citadels of kings) "या उपक्रमांतर्गत विजयगडावर (Vijayagad) दिपोत्सव साजरा (Celebrating Dipotsav) करण्यात आला.

या दिपोत्सवाला २८ मावळे, ३ बालमावळे, २ रणरागिणी व १ बालरणरागिणी असे एकूण ३४जणांनी हजेरी लावली. इतिहास संशोधक व लेखिका सौ.सरला भिरूड मँडम यांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला. सुरवातीला श्रीक्षेत्र त्रिवेणी मंदिरावर पुजन करून विजयगडावरील पुर्वाभिमुख व उत्तराभिमुख दरवाज्यांचे पुष्पहार लावून व रांगोळी काढून पुजन करण्यात आले व नंतर गडावर भटकंती करण्यात आली. या भटकंतीत दगडाचे घडीव जाते, उखळ, दगडी मुसळी आढळून आले.

गडाच्या इतिहासाविषयी बुरूज,तटबंदी,कोरीव लेणी या विषयी इतिहास संशोधक व लेखिका सौ.सरला भिरूड  मँडम यांनी सविस्तर माहीती दिली. यावेळी त्यांनी अशीरगड, लासुर येथील साखरबाहूली, श्रीक्षेत्र नाटेश्वर मंदिर व सत्रासेन येथील खासरागड या विषयी सविस्तर माहीती दिली.विजयगडानंतर त्यांनी लासुर येथील साखर बाहुली व नाटेश्वर मंदिराला भेट दिली.

  या कार्यक्रमाचे आयोजन टीम एक्सप्लोर खांदेशचे रुषीकेश पवार,चोपडा एम एच १९चे निलेश भंगाळे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चोपडाचे अध्यक्ष जिग्नेश कंखरे, चौगाव वन व्यवस्थापण समितीचे व ऐतिहासिक वारसा संवर्धन क्रुती समितीचे सदस्य उपस्थीत होते. यावेळी इतिहास संशोधक व लेखिका  सौ.सरला भिरूड यांनी लिहीलेले "तोरणमाळ"हे पुस्तक उपस्थीतांना भेट म्हणून देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com