सुसरी जिल्हा परिषद शाळेचा 150वा महोत्सव साजरा

स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन ः विविध स्पर्धांचे आयोजन, आजी-माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती
सुसरी जिल्हा परिषद शाळेचा 150वा महोत्सव साजरा

वरणगाव Varangaon, ता.भुसावळ । वार्ताहर

तालुक्यातील सुसरी (Susari ) येथील जि.प. मराठी मुलांची शाळेचा (Zilla Parishad School) 150 वा महोत्सव दि. 1 एप्रिल 22 रोजी साजरा (Celebrate) करण्यात आला.

कार्यक्रम अध्यक्ष सरपंच उर्मिलाताई पाटील (Chairman Sarpanch Urmilatai Patil) होत्या. प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान व केंद्रप्रमुख गजानन नारखेडे होते

दि.1 एप्रिल 1872 रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात (pre-independence period) जि.प. मराठी मुलांची शाळा (Zilla Parishad School) सुसरी (Susari ) शाळेची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस गावात शाळा व्हावी व गावाचा शैक्षणिक विकास व्हावा, गोरगरिब व शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कै. दयाराम तुकाराम पाटील यांनी त्यांच्या मालकीचे 56 आर (1 एकर, 38गूंठे) क्षेत्रफळ असलेले शेत शाळेसाठी दिले. त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे कै.दयाराम पाटील (Late Dayaram Patil) यांना ग्रामपंचायत सुसरीचे प्रथम सरपंच होण्याचा बहूमान मिळाला होता.

स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या या शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना देशप्रेमाची व राष्ट्रीय मूल्यांची शिकवण (Teaching of national values) मिळाली. अनेक माजी विद्यार्थी सैनिक, पोलिस व फौजदार या पदावर कार्यरत झाले. त्यामुळे सैनिकांचे गाव, फौजदारांचे गाव (Faujdar's village) म्हणून गावास जिल्ह्यात नावलौकीक मिळाला. आजही देशरक्षणासाठी गावातील अनेक तरुण सिमेवर कार्यरत आहे. डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, माध्य.-प्राथ. शिक्षक, शिक्षण क्षेत्र, बांधकामक्षेत्र, आर्थिक, सामाजिक, प्रचार प्रसार क्षेत्र, उद्योजक व व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रात आजही शाळेचे माजी विद्यार्थी यशाची उंच उंच शिखरे गाठत आहे. अशा प्रत्येक विद्यार्थ्यांचा निश्चितच शाळेस अभिमान आहे, असे मनोगत माजी विद्यार्थी विनोद पाटील व शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.

एकेकाळी इयत्ता पहिली ते सातवीपर्यत 300 ते 400 पटसंख्या असणार्‍या व दुबार भरणार्‍या या शाळेचा नावलौकीक होता. मात्र कालांतराने इंग्रजी माध्यमाच्या शाळा आकर्षण, भौतिक सुविधांचा अभाव व इतर कारणामुळे शाळेची पटसंख्या (School enrollment) कमी झाली. मात्र येथील शिक्षक हरला नाही. गावकर्‍यांचे सहकार्य व उत्तम शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न कायम सुरू आहे. लवकरच सेमी इंग्रजी अभ्यासक्रम (Semi English course) शाळेत उपलब्ध असणार आहे यासाठी गावकरी व पालक यांनी शाळेस सहकार्य करावे, असे आवाहन वरणगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी केले.

शाळेचे पुजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन डॉ.निकीता क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपाली भंगाळे (Headmaster Deepali Bhangale) यांनी केले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यानंतर महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच उर्मिला पाटील, उपसरपंच रविंद्र पाटील, शि.वि.अधिकारी तुषार प्रधान, केंद्रप्रमुख गजानन नारखेडे, ग्रामसेवक प्रदीप वंजारी, शा.व्य. समिती अध्यक्ष नयना पाटील, ग्रा.पं. सदस्य पूनम पाटील, सुसरी उपकेंद्र येथील डॉ.निकीता क्षिरसागर, डॉ. कोमल नेरकर, अंगणवाडी सेविका वत्सला पाटील, कमल फालक, शकूंतला पाटील, आशा मोरे, नर्मदा पाटील तसेच माजी विद्यार्थी एकनाथ पाटील, गुलाब पाटील, विनोद पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, योगेश सपकार तसेच शाळेचे विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शिक्षिका मीरा पाटील-जंगले यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com