भक्तिमय वातावरणात गुरुनानक जयंती साजरी

भक्तिमय वातावरणात गुरुनानक जयंती साजरी

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

शिख समाजचे संस्थापक गुरुनानक यांची 552 व्या जयंतीनिमित्ताने (Guru Nanak Jayanti) येथील दशमेश मार्गावरील गुरुद्वारात (Gurudwara) दि. 19 रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे (Religious events)आयोजन मोठ्या उत्साहात (Celebrating) करण्यात आले.

गुरुनानक यांच्या जयंती निमित्ताने 17 नोव्हेंबर रोजी 10 वाजेपासून गुरुद्वारामध्ये अखंड पाठसाहेबची सुरुवात करण्यात आली होती. त्याचा समारोप 19 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला. या निमित्ताने गुरुद्वारामध्ये आरती, शबद, व कीर्तन पार पडले. सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत भजन कीर्तन झाले. त्यानंतर गुरुद्वारामध्ये लंगरला सुरुवात करण्यात आली. त्याचा साधारण 3 हजार 500 भाविकांनी लाभ घेतला.

भक्तिमय वातावरणा जन्मोत्सव - दि. 19 रोजी रात्री 10 ते मध्यरात्रीपर्यंत गुरुद्वारामध्ये शबद, कीर्तनांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात रात्री 10 ते 11 बालकांसाठी, 11ते 12 वाजेपर्यंत युवक तर मध्यरात्री 12 ते 1.20 वाजेपर्यंत ग्रंथी साहेब यांचे धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री 1.20 वाजता धर्मगुरु गुरुनानक यांचा जन्मोत्सव साजारा करण्यात येऊन जन्मोत्सवाचा समारोप करण्यात आला.

शहरात प्रभात फेरी - दरम्यान, जन्मोत्सवानिमित्ताने शहरातील विविध भागातील मार्गावर समाज बांधवांकडून 8 ते 17 नोव्हेंबर दरम्यान पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. विविध मार्गावरुन येणार्‍या प्रभातफेरीचा समारोप येथील गुरुद्वारामध्ये करण्यात येत होते.

महिनाभरापासून जन्मोत्सवाची तयारी-

20 ऑक्टोपरपासून धर्मगुरु गुरुनानक यांच्या जन्मोत्सवानिमित्तानेे गुरुद्वारामध्ये अखंड पाठ साहेबची चालविण्यात आले. यात शिख समाज बांधवांसह सिंधी बांधवांनीही पाठ साहेबचे पठण केले.

कोरोना नियमांचे पालन- दरम्यान, साधारण मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचे सावट होते. त्या पार्श्वभूमिवर अनेक धार्मिक कार्यक्रमांवर शासकीय निर्बंध असल्यामुळे मागील वर्षभरात कार्यक्रम रद्द किंवा मर्यादीत स्वरुपात करण्यात आले होते. यावर्षी शासनाने कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्याने यावर्षी धर्मगुरु गुरुनानक यांचा जन्मोत्सव कोरोनाच्या नियमांचे पालन करुन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिख समाजाचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंती उत्सवासाठीच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन व यशस्वीतेसाठी गुरुद्वारा मंडळाचे अध्यक्ष बलदेवसिंह पल्ला, सचिव सुरेंद्रपालसिंह छाबडा, सेक्रेटरी हरदीपसिंह छाबडा, गुरुदीपसिंह छाबडा, गुरुप्रीतसिंह बल, गुरुजीतसिंह पदम, जगजीतसिंह छाबडा, रणजितसिंह बल, बोनीसिह आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांसह विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com