रावेर शहरावर सीसीटीव्हीची नजर

डीपीटीसीतुन १७ लाखाचा निधी मंजूर
रावेर शहरावर सीसीटीव्हीची नजर

रावेर Raver|प्रतिनिधी

शहरातील सर्व मुख्य चौक व रस्त्यांवर ठिकठिकाणी पालिका (Municipality) कॅमरे बसवणार असल्याने,आता शहराच्या सुरक्षिततेसाठी तिसरा डोळा (CCTV eyes) लवकरच कार्यन्वित होणार असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी स्वलिहा मालगावे यांनी दिली.

शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध चौक व रस्त्यावर कॅमेरे बसवण्यात येणार आहे.रावेर शहराची ओळख संवेदनशील असल्याने,शहरातील दंगलीत हॉट स्पॉट ठरलेल्या भागासह,इतर ठिकाणी १२० कॅमरे बसविण्यात येणार आहे.यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने १७ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

रावेरात या पूर्वी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने,अनेक घटनांना आळा बसविण्यात यश मिळाले होते.या शिवाय अनेक गुन्ह्याच्या तपासात देखील या कॅमेऱ्यानी मोलाची जबाबदारी पार पाडली.

त्यांच्या मदतीला पालिका आणखी १२० कॅमेरे बसविणार असल्याने,संपूर्ण शहराची सुरक्षा यातून होणार आहे.लवकरच शहरात कॅमरे कार्यन्वित होतील असा विश्वास पालिका मुख्याधिकारी स्वलिहा मालगावे यांनी व्यक्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com