आरएल समूहाच्या राज्यभरातील अस्थापनांसह घरांवर सीबीआयचा छापे

बारा तासांपासून सुरु होती चौकशी; महत्वाची कागदपत्रे घेवून पथक रवाना
आरएल समूहाच्या राज्यभरातील अस्थापनांसह घरांवर सीबीआयचा छापे

जळगाव । प्रतिनिधी । Jalgaon

आरएल अर्थात राजमल लखीचंद ज्वेलर्स (Rajmal Lakhichand Jewellers) समूहाच्या राज्यभरात शाखा असून चारचाकी वाहनांचे देखील शोरुम आहे. स्टेट बँकेतील 525 कोटींच्या थकीत कर्जापोटी दिल्लीतील सीबीआयच्या पथकाने आरएल समूहाच्या जळगाव व नाशिकमधील ज्वेलर्सच्या या सोन्याच्या अस्थापना व दोन वाहनांच्या रुमसह ठाणे व जळगावातील घरावर मंगळवारी सकाळच्या सुमारास एकाचवेळी छापा टाकत झाडझडती घेतली. याठिकाणाहून पथकाने बँकेच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांच्या प्रति घेवून पथक तब्बल बारा तासानंतर माघारी परतले असल्याची माहिती समूहाचे संचालक माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा.ईश्वरलाल जैन यांच्या आरएल समूह नावाने राज्यभरात अस्थाना आहेत. यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून सुमारे 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु काही कारणास्तव हे कर्ज थकले असल्याने बँकेकडे गहाण असलेल्या मालमत्ता बँकेकडून विक्री करण्यात आल्या होत्या. तरी देखील बँकेकडून आरएल समुहाकडे 1500 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करीत असल्याने बँक व आरएल समुहामध्ये वाद सुरु होते. दरम्यान, बँकेतील कर्जाची सेटलमेंट करण्यासाठी समूहाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु बँकेने कर्जदाराला साक्षीदारांच्या स्वाक्षरी लागणार असल्याची अट त्यांना घातली होती. परंतु माजी खा. जैन यांचा मुलगा अमरीष जैन हा विभक्त राहत असल्याने तो स्वाक्षरी देण्यास तयार नव्हता. त्यामुळे हे प्रकरण मार्गी न लागत असल्याने स्टेट बँकेने याबाबतची तक्रार दिल्ली सीबीआयकडे केली होती.

60 जणांच्या पथकाकडून एकाचवेळी छापा

दिल्ली सीबीआयच्या सुमारे 60 जणांच्या पथकाने जळगाव, नाशिक व ठाणे येथील अस्थापना व घरांवर छापे टाकले. यामध्ये सुमारे 20 ते 25 जणांच्या पथक आरएल समूहाच्या जळगावील आर.एल. ज्वेलर्स, नाशिक येथील ज्वेलर्सचे शोरुम व मानराज व नेक्सा या वाहनांच्या शोरुमसह जळगावातील राहते घर आणि ठाणे येथील फ्लॅटवर एकाच वेळी छापा टाकला. याठिकाणाहून पथकाने बँकेसह व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांच्या प्रति त्यांनी ताब्यात घेतल्या.

12 तास सुरु होती झाडाझडती

सीबीआयचे पथक सकाळी 7 वाजेच्या सुमारास आरएल समूहाच्या रथ चौकातील ज्वेलर्सच्या दुकानावर आले. परंतु अस्थापना बंद असल्याने पथकाने सुरक्षा रक्षकाला सोबत घेवून त्यांनी माजी खा. जैन यांच्या निवासस्थानी गेले. घरातील कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर त्यांनी पुन्हा जळगावातील ज्वेलर्सच्या शोरुमसह वाहनाच्या शोरुमध्ये झाडाझडती घेतली. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पथक माघारी गेल्याने सुमारे बारा तास ही चौकशी सुरु होती.

पीठ गिरणीसह भिंतींची तपासणी

सीबीआयच्या पथक सकाळच्या सुमारास माजी खा. जैन यांच्या निवासस्थानी गेले. या पथकाने आपली ओळख दिल्यानंतर त्यांनी संपुर्ण घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर त्यांच्या घरातील पीठाची गिरणीसह घराच्या भिंती ठोठावून हिंदी सिनेमाप्रमाणे पथकाने तपासणी केली.

माजी आ. मनिष जैन यांचा लॅपटॉप नेला सोबत

आरएल समुहाशी संबंधित असलेल्या अस्थापनांसह शोरूममध्ये चौकशी करीत त्यांना संशयास्पद व व्यवहारासंबंधित असलेली कागदपत्रांच्या प्रती पथकाने सोबत घेतल्या. तसेच माजी आ. मनिष जैन यांचा लॅपटॉप पथक सोबत घेवून गेले आहे.

जळगावसह अन्य पासींगच्या वाहनातून पथक दाखल

दिल्लीतील सीबीआयचे पथक हे खासगी वाहनांनी जळगावात दाखल झाले. याठिकाणी कुणालाही संशय येवू नये म्हणून पथकाने जळगावातील काही खासगी वाहनांमधून अन्य ठिकाणी छापे टाकले. दरम्यान, छापा टाकतांना पथकाकडून अत्यंत गोपनियता पाळण्यात आली होती.

स्टेटबँकेकडून आरएल समूहाने जे कर्ज घेतले आहे त्या कर्जासंदर्भात वाद बँक व आमच्यात वाद सुरु आहे. याबाबत स्टेटबँकेनी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने सीबीआयच्या पथकांनी सर्च वॉरंटसह आरएलसमूहाच्या जळगाव, नाशिक, ठाणे येथील अस्थापना व निवासस्थांनी तपासणी करुन कागदपत्रांच्या प्रति ताब्यात घेतल्या आणि या पुढेही सीबीआयच्या तपासात जी मदत लागेल ती करण्यास तयार आहे.

माजी खा. ईश्वरलाल जैन, संचालक आरएल समूह

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com