सावधान ; पुढील पाच दिवस उष्णतेची लाट

जिल्हा प्रशासनाने दिल्या उष्माघातातून बचाव करण्यासाठी या सूचना
सावधान ; पुढील पाच दिवस उष्णतेची लाट

जळगाव - jalgon

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (District Disaster Management) प्राधिकरण जळगाव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हयाच्या वाढत्या तापमानाने जिल्हयातील कामगार, मजुर, शेतमजुर (Workers, laborers, agricultural laborers) तसेच शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले (Farmers, senior citizens, children) व महिला या सर्व स्तरावरील नागरीकांचे (Heat wave) उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणेसाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सावधान ; पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
राणा दाम्पत्याला झटका; हायकोर्टाने याचिका फेटाळली

त्यानुसार जिल्हयातील सर्व तालुक्यातील संबंधित यंत्रणा आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयांनी उष्माघाताने होणारी जिवीतहानी टाळणेकामी आवश्यक त्या खबरदारी, दक्षता व उपाययोजना करण्यात याव्यात.

जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील लग्न समारंभ, धार्मिक व सामाजिक मेळावे तसेच शालेय व महाविद्यालय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा, समारंभ आयोजित करण्यात आलेले असल्याने अशा सर्व ठिकाणच्या आयोजक व प्रायोजकांनी उपस्थित सर्व नागरिकांचे उष्माघातापासून बचाव करणेकामी आयोजनस्थळी सावलीसाठी ग्रीनशेड, मंडप तसेच मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इ.सुविधा करण्यात याव्यात.

त्याचप्रमाणे जिल्हयातील महानगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात रेल्वे,बसस्थानक, बाजार परिसर तसेच मंगल कार्यालय इ.ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे पाणपोई, सावलीसाठी ग्रीनशेड तसेच आरोग्य विभागाद्वारे सुसज्ज उष्माघात कक्ष स्थापन करावेत. जेणेकरुन उष्माघातांमुळे होणारी जिवीतहानी टाळता येणे शक्य होईल.

‘‘उष्माघात काय करावे व काय करु नये’’

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या ताटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात यावी.

1. उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरिता रेडिओ, टि.व्ही., सोशल मिडीया व स्थानिक वृत्तपत्रे प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात यावा.

2. जिल्हा नियंत्रण कक्ष / महानगरपालिका नियंत्रण कक्ष/ विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित कार्य करावे.

3. सर्व संबंधित विभाग, स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी सदर कार्यात सामील व्हावे.

काय करावे

1. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

2. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

3. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा.

4. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

5. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.

6. शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी,

लिंबू पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करण्यात यावा.

7. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे

ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

8. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे.तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी घ्यावे.

9 घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात.

10. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

11. कामाच्या ठिकाणी जवळच धंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

12. सुर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

13. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.

14. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

15. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

16. रस्ताच्या कडेला उन्हापासुन संरक्षणाकरिता शेड उभारावेत.

17. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावा.

काय करु नये

1. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

2. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

3. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

4. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी 12.00 ते 03.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.

5. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडकी उघडी ठेवण्यात यावी.

अशा सूचना (राहुल पाटील) निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.