
चिंचोली Chincholi ता यावल
येथून जवळ असलेले आडगाव येथील रहिवासी शिवाजी पंडितराव पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला (cowshed) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक आग (sudden fire) लागल्याने गोठ्यात असलेले शेतीचे साहित्य (Agricultural materials) व गोठ्यात बांधलेल्या सात गुरांपैकी दोन गुरांचा (two cattle) जागीच मृत्यू (Death on the spot ) झाला असून पाच गुरे गंभीर भाजल्याने जखमी झाले आहेत. सदर घटना दिं ९ मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास घडली. वेळीच यावल अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.
दि.९ मंगळवार रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घरासमोरील असलेल्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गुरांच्या गोठ्यामध्ये शिवाजी पाटील यांचे शेती उपयोगी येणारे ५० नग दोन व अडीच इंची पीव्हीसी पाइप , ५० बंडल ठिबक सिंचन नळी , शेतीचे अवजारे , व इतर साहित्य , लाकडी दांड्या , सरे ,व लोखंडी पत्रे , आदि सामानासह १ पाच ते सहा वर्षांचा गो-हा , १ व्यायलेल्या गायीचा गंभीर भाजल्याने जागीच मृत्यू झाला.
पाच गुरे गंभीर जखमी झाले असुन असे एकुण तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामा करण्यात आला आहे.सदर घटनास्थळी तलाठी यांनी पाहणी व पंचनामा करून तसा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.