ग.स.निवडणुकीसाठीं आज प्रचार तोफा थंडावणार
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
ग. स. सोसायटीच्या (G. S. Society) निवडणुकीच्या (elections) 21 जागांसाठी 115 उमेदवार रिंगणात असून दि.27 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता प्रचार (Propaganda) तोफा थंडावणार आहे. जिल्ह्यात 15 मतदान केंद्र (Polling station) कार्यान्वित करण्यात आले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहातून मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सहकार निवडणूक विभागाकडून तयारी पूर्णत्वाकडे आली आहे, अशी माहिती सहकार निवडणूक निर्णय अधिकारी (Co-operative Election Decision Officer) संतोष बिडवई (Santosh Bidwai) यांनी दिली.
.
ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या 21 जागांसाठी दि. 28 एप्रिल रोजी मतदान (Voting) होणार असून 30 एपिल रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक असे एकूण 15 मतदान केंद्र (Polling station) कार्यान्वित करण्यात आले आहे. सोमवारी मतदान अधिकार्यांसह 350 कर्मचार्यांना प्रशिक्षण (Training of employees) देवून सहकार निवडणूक विभागाकडून तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. दि.27 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता प्रचार तोफा थंडावणार आहे. त्यादृष्टीने सहकार निवडणूक विभागाकडून 27 रोजी 10 वाजता मतदान अधिकार्यांसह कर्मचार्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Bahinabai Chaudhary North Maharashtra University) सभागृहात मतदान साहित्य वाटप करुन नियुक्तीच्या मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना होणार आहे.
या निवडणुकीसाठी सहकार, लोकसहकार, लोकमान्य, प्रगती शिक्षक सेना आणि स्वराज्य पॅनल यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 115 उमेदवार मैदानात असून 36 हजार 175 मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे