भारनियमनांच्या पार्श्वभूमीवर वीजचोरीविरुद्ध मोहीम

अतिरिक्त भार असणार्‍या फीडरच्या परिसरात होणार तपासणी
भारनियमनांच्या पार्श्वभूमीवर वीजचोरीविरुद्ध मोहीम

जळगाव । jalgaon । प्रतिनिधी

उन्हाची तीव्रता कारखानदारांकडून (manufacturers) वीजमागणी वाढली आहे. त्यामुळे महावितरणची सध्याची सर्वाधिक मागणी 24 हजार 500 मेगावॅटपर्यंत नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. सदर रोहित्रांवर वीजचोरी (power theft) आढळ्यास संबंधित ग्राहकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

महावितरणचे संचालकांनी महावितरणच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांची ऑनलाईन बैठक घेतली. विजेची चोरी करणार्‍या किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले. प्रत्येक जिल्ह्यातील रोहित्रांवर मंजूर भारापेक्षा जास्त भार असल्यास अशा सर्व रोहित्रांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेत ग्राहकांनी वीजचोरी केली असल्यास वा वीज यंत्रणेवर आकडे टाकून वीजचोरी करणार्‍यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा. वीजचोरी करणार्‍या सर्व ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 126 नुसार अदखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

...तर संबंधितांना धरणार जबाबदार

मुख्यालय पातळीवरून राज्यातील सर्व वीजवाहिन्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अतिभारीत असलेल्या वीज वाहिन्यांची माहिती क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधिकार्‍यांकडे पाठवली आहे. रोहित्रांवरील अतिरिक्त भार कमी न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

भारनियमनाची तीव्रता कमी होणार

या मोहिमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. तसेच या मोहिमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होणार असून भारनियमनाची तीव्रता कमी होईल.

Related Stories

No stories found.