अतिक्रमण कारवाईत  हातगाड्या जप्त

अतिक्रमण कारवाईत हातगाड्या जप्त

कारवाईस भाजीविक्रेत्यांचा विरोध; दंड वसूल करुन नाशवंत माल केला परत

जळगाव- jalgaon

महानगरपालिका अतिक्रमण निर्मुलन (Municipal Encroachment Elimination) विभाग कारवाईसाठी पुन्हा सक्रीय झाले. गुरुवारी बळीरामपेठ, सुभाषचौक, राजकमल चौक आणि टॉवर चौकात भाजी विक्रेत्यांवर (vegetable sellers) कारवाई करत, सात हातगाड्या जप्त केल्या. तसेच दंड वसूल करुन जप्त केलेला नाशवंत माल विक्रेत्यांना परत केला. कारवाई दरम्यान, भाजीपाला विक्रेते आणि महापालिकेचे पथक यांच्यात वाद (Argument) निर्माण झाला होता.

गणेशोत्सवाच्या दरम्यान, अतिक्रमण निर्मुलन कारवाईची मोहीम थांबली होती. त्यामुळे विक्रेत्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बळीरामपेठ, सुभाष चौक, टॉवर चौक, राजकमल चौक या भागांमध्ये आपापली दुकाने थाटली. परिणामी, अतिक्रमण होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिक्रमण विभागाने कारवाईची मोहीम पुन्हा सुरु केली आहे.


विक्रेत्यांकडून दंड वसूल


अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर ज्या विक्रेत्यांचा नाशवंत माल होता, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत, त्यांचा माल परत केला. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठाकूर, नाना कोळी, दीपक कोळी, भानुदास ठाकरे, सलमान भिस्ती, किशोर सोनवणे, नितीन भालेराव यांनी केली.


बाजारपेठेत अडीच तास कारवाई


महानगरपालिकेचे पथक सकाळी १० वाजता बळीरामपेठेत पोहचताच कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाईला विरोध केल्यामुळे महानगरपालिकेचे पथक आणि विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत कारवाईची मोहीम राबवून भाजीपाल्यासह सात हातगाड्या जप्त केल्या.


विक्रेत्या महिलेची आर्तहाक


भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करतांना एका भाजीपाला विक्रेत्या महिलेची हातगाडी अतिक्रमण विभागाच्या पथकाने जप्त केली असता, त्या महिलेने कारवाई करण्यास विरोध करत, कारवाई करु नका अशी कर्मचार्‍यांना विनंती केली. मात्र महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी त्या महिलेची आर्तहाक न ऐकता, हातगाडी जप्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com