इदगाह ट्रस्टच्या सचिवाने खाल्ले मृतांच्या टाळूवरचे लोणी

एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
इदगाह ट्रस्टच्या सचिवाने खाल्ले मृतांच्या टाळूवरचे लोणी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील इदगाह ट्रस्टच्या (Idgah Trust) माध्यमातून ट्रस्टचे सचिव (Secretary of the Trust) शेख फारूख शेख अब्दुल्ला यांनी कोरोना काळात (During the Corona period) 111 मुस्लिम बांधवांच्या दफनविधीसाठी (burial) बनावट कागदपत्रे (forged documents) सादर करून जळगाव महापालिकेची (Jalgaon Municipal Corporation) दोन लाखात (two lakhs) फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सचिव फारुख शेख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शेख मुश्ताक अहमद मोहम्मद इकबाल रा.सालार नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील मुस्लीम कब्रस्थान व ईदगाह न्यास ट्रस्टचे ते सभासद आहेत. ईदगाह मैदानाच्या कब्रस्थानमध्ये मयताच्या नातेवाईकांकडून नाममात्र 100 रुपये शुल्क आकारून नोंदणी केली जाते तर दफनविधीला लागणारा खर्च मयताच्या नातेवाईकांनीच करायचा असतो. परंतु मुस्लीम कब्रस्थान व ईदगाह न्यास ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अब्दुल वहाब अब्दुल रज्जाक मलीक असून सचिव शेख फारुख शेख अब्दुल्ला हे आहेत.

बँकेचे सर्व व्यवहार हाताळणे, न्यासचा हिशोब ठेवण्याचे काम सचिवांकडे आहे. नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2022 दरम्यान कोविड संसर्गाने मृत झालेले असल्याचे दर्शवित त्यांच्या अंत्यसंस्कार कामासाठी प्रत्येकी 1750 खर्च झाल्याचे मांडण्यात आले होते. दोन वर्षात 111 मृतांचा दफनविधी करण्यासाठी प्रत्येकी 1750 रुपये 1 लाख 94 हजार 250 रुपये खर्च झाले असून त्यासंबंधी पत्रव्यवहार करीत जळगाव मनपाकडून मागणी केली होती.

माहिती अधिकारातून उघडकीस आला प्रकार

मनपाने खर्चाला मान्यता देत कर कापून 1 लाख 86 हजार 480 रुपये ट्रस्टच्या खात्यात वर्ग केले होते. फिर्यादी यांनी माहिती अधिकार अंतर्गत सर्व कागदपत्रे आणि ऑडिट रिपोर्ट मागविले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लागलीच पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार इदगाह ट्रस्टचे सचिव शेख फारूख शेख अब्दुल्ला रा. हाजी अहमद नगर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com