बसच्या धडकेत वृध्द महिलेचा मृत्यू

बसच्या धडकेत वृध्द महिलेचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव बस स्थानक (Chalisgaon Bus Station) परिसरातून जात असताना वयोवृद्ध महिलेला (old woman) बसने मागाहुन जोरदार धडक (Dhadak) दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू (conscious death) झाला. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात चालकाविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पिलखोड येथील पार्वताबाई लक्ष्मण पाटील (८०) ह्या वयोवृद्धा बँकेच्या कामानिमित्त चाळीसगाव येथे बुधवार रोजी दुपारी १२ वाजता आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी चाळीसगाव बस स्थानकावर सायंकाळी आल्या. तेव्हा धुळे डेपोमधील बसने (क्र. एम.एच. १४ बीटी २३५२) जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी शांताराम रामचंद्र पाटील रा. पिलखोड ता. चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्थानकात चालक सुनिल लक्ष्मण बिडगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास अजय मालचे हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com