हरताळा फाट्याजवळ बसचा अपघात  : बारा जखमी

हरताळा फाट्याजवळ बसचा अपघात : बारा जखमी

चौघांना जळगावला हलवले

मुक्ताईनगर  Muktainagar

शासकीय कृषी महाविद्यालया (Government Agricultural Colleges) समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर (National Highway No. Six) हरताळा फाट्याजवळ एका चार चाकी वाहना (Four wheeler vehicles) वाचवण्याच्या प्रयत्नात मंगरूळपीर  आगाराच्या (Mangrulpir Agar)बसच्या (bus) झालेल्या अपघातामध्ये (accident) बस  मधील 12 प्रवासी जखमी (passenger injured) झाले असून चौघांना जळगाव येथे घालवण्यात आलेले आहे.

हरताळा फाट्याजवळ बसचा अपघात  : बारा जखमी
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

सायंकाळी सहा ते  सात वाजेच्या सुमारास जळगाव येथून अकोला मार्गे मंगरूळपीरकडे जाणारी बस क्रमांक एम एच 13 सी यू 6719 ने व्हॅगनार कंपनीच्या चार चाकी गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. नव्यानेच हा महामार्ग बनलेला असल्याने दिशादर्शक फलक योग्य नसल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अपघात प्रसंगी कारचालक आपले वाहन रिव्हर्स घेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिली. या अपघातात एकूण बारा प्रवासी जखमी झाले असून चौघांची परिस्थिती अत्यवस्था असल्याने त्यांना जळगाव येथील रुग्णालयात घालवण्यात आलेले आहे. आ. चंद्रकांत पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांसह तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी व समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेऊन जखमी प्रवासी यांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हा  रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान चौघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे हलवण्यात आलेले आहे.

हरताळा फाट्याजवळ बसचा अपघात  : बारा जखमी
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

अपघातातील जखमी -- 

संगीता मोहनलाल राठोड वय 30 वर्षे राहणार धामणगाव तालुका मुक्ताईनगर पांडुरंग बोरसे वय 60 वर्षे राहणार विटाळी तालुका नांदुरा प्रवीण पंडित वानखेडे वय 35 वर्षे नांदुरा शेख हुसेन शेख वय 60 वर्ष मुक्ताईनगर भास्कर नीना बेलदार वय 60 वर्षे मुंडोळ दे अनिकेत संजय बॉम्बे वय वीस वर्षे मुक्ताईनगर सलीम उद्दीन हाफिज उद्दीन वय 60 वर्ष जळगाव जामोद जयमुद्दीन हाफिसुद्दीन वय 58 वर्षे जळगाव जामोद सीताबाई जगदेव नावकर वय 65 वर्ष राजुरा श्रीकृष्ण सोपान पाटील वय 33 वर्षे कोथळी तालुका मुक्ताईनगर भाग्यश्री श्रीकृष्ण पाटील वय 23 वर्षे राहणार कोथळी तालुका मुक्ताईनगर योगेश सतीश तायडे वय 25 वर्षे राहणार मुक्ताईनगर असे 12 जण या अपघातात जखमी झाले असून यापैकी संगीता राठोड सीताबाई नावकर श्रीकृष्ण सोपान पाटील भाग्यश्री श्रीकृष्ण पाटील अशा चौघांना उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले आहे तर इतर जखमींनी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले.

आमदारांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवली

दरम्यान अपघात होता बरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले पूनमचंद जैन सोपान दांडगे आणि प्रदीप काळे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले असता तात्काळ रुग्णालय पाठविण्यात आली व त्यावेळेस छोटू भोई गणेश टोंगे राजेंद्र हिवराळे प्रफुल्ल पाटील वसंत भलभले शुभम शर्मा यांच्यासह शिवसैनिकांनी रुग्णांना उपचारार्थ हलविण्यासाठी मदत केली.

हरताळा फाट्याजवळ बसचा अपघात  : बारा जखमी
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

गतिरोधक उभारण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व शासकीय कृषी महाविद्यालय या ठिकाणी कोथळी बायपास जवळ अपघात टाळण्यासाठी गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

काचेतून बाहेर फेकले गेले प्रवासी

समोरून रिव्हर्स येणाऱ्या चार चाकी वाहनाला वाचविण्यासाठी मंगरूळपीर बस शासकीय कृषी महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या गटारीत बस जाऊन अडकली बस इतक्या वेगात होती की बस मध्ये बसलेले काही प्रवासी समोरच्या काचेतून बाहेर रस्त्यावर व शेतात फेकले गेले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com