रावेरात नबाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

भाजयुमोवतीने जोरदार निदर्शने
रावेरात नबाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

रावेर| Raver प्रतिनिधी-

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणानंतर एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे (NCB Director Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप करणारे कॅबिनेट मंत्री नबाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) विरोधात देखील अनेक आरोप केल्यावर त्यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशध्यक्ष विक्रांत पाटील (Bharatiya Janata Yuva Morcha State President Vikrant Patil) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर निदर्शने सुरू आहे.

रावेरात बुधवारी भाजयुमोच्यावतीने मंत्री मलिक यांचा पुतळा दहन करण्यात आला.यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील झाली, मुंबई बॉम्ब ब्लास्टमधील आरोपीच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करणाऱ्या नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील,प. स.सदस्य जितेंद्र पाटील,प्रमोद चौधरी, राहुल पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com