गद्दारांचे भ्रष्ट विचार धगधगत्या मशालीमध्ये जाळून टाका

शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची गर्जना
गद्दारांचे भ्रष्ट विचार धगधगत्या मशालीमध्ये जाळून टाका

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अंतिम चिन्ह येईपर्यंत घराघरात हातातली ‘मशाल’ (torch in hand) पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे. मशालीच्या वाटचालीमध्ये (progress) जे गद्दार येतील (traitors will come) त्यांचे भ्रष्ट विचार (corrupt thoughts) या धगधगत्या मशालीमध्ये जाळून (burn) टाका, अशी गर्जना शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत (Shiv Sena's communication chief Sanjay Sawant) यांनी केले. रविवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा सभागृहात आयोजित शिवसेना मेळाव्यात (Shiv Sena meeting) ते बोलत होते.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, डॉ.सुनिल महाजन, शहरप्रमुख शरद तायडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले की, कोराना काळात उध्दव ठाकरे यांनी उत्कृष्ट काम केल्यामुळे जगाने त्यांच्या कामाची दखल घेतली.

मात्र, अडीच वर्षे उध्दव साहेब यांना मुख्यमंत्री चालले आणि आता मात्र साहेबांविषयी बोलतांना तुम्हाला थोडीफार वाटत नाही का? मग सरकार स्थापन करण्याच्या वेळेस तुम्ही का बोलले नाही? आता हे गद्दार हिंदुत्व शिकवत आहेत. या चाळीस गद्दारांना आगामी निवडणुकीत जनता जागा दाखविणार असून शिवसैनिकांच्या मनात धगधगती आग पेटली आहे. त्यामुळे यांचे फार दिवस राहिले नाही.

यांना जमिनीवर आणल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरदेखील संजय सावंत यांनी टिकेचे तोफ डागली. शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com