एकाच रात्री ११ ठिकाणी घरफोडी : सहा लाखाच्यावर रकमेसह ऐवज लंपास

चोरट्यांचे पोलीसांसमोर आव्हान; श्वानपथक हतबल
एकाच रात्री ११ ठिकाणी घरफोडी : सहा लाखाच्यावर रकमेसह ऐवज लंपास

वरणगाव, ता.भुसावळ (Varangaon, Tal. Bhusawal) | वार्ताहर -

तालुक्यातील ओझरखेडे, पिंपळगाव बुद्रुक व तळवेल येथे एकाच रात्री चोरट्यांनी (Thieves broke) अकरा ठिकाणी (eleven places) घरफोडी (Burglary) करून सहा लाख सात हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारच्या मध्यरात्री घडली. घरफोडी झालेल्या घरातील कुटुंब घराच्या गच्चीवर झोपायला गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. या प्रकारामुळे गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांविरूध्द वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी तालुक्यातील तळवेल येथे दोन, पिंपळगाव बु. येथे पाच व ओझरखेडे येथील चार अशा ठिकाणी घरफोडी केली. यामध्ये रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. घरफोडी झालेल्या घरातील कुटुंब गच्चीवर झोपले होते.

घरफोडीची घटना सकाळी निदर्शनास आल्याने गावकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. पिंपळगाव बु. येथे आत्माराम कडू पाटील, रमेश लक्ष्मण पाटील, आनंदा सिताराम सरोदे, मधूकर सरोदे तसेच ओझरखेडे येथे अशोक चावदस नेमाडे, गोकुळ तुकाराम नेमाडे व उमराव पाटील याच्या घराचे कुलुप तोडले.

परंतु वरणगाव पोलीसात सायंकाळ पर्यंत फिर्याद दाखल नव्हती तर फिर्याद दिलेल्यांपैकी किसन शेनफळू बेंडाळे (रा.पिंपळगाव बु.) यांच्या घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम २० हजार रुपये, अनिता सिताराम सरोदे यांच्या घरातील १० हजार रोख व दीड तोडे सोन्याची पोत २५ हजार किंमतीची, अशोक मधुकर सरोदे यांच्या घरातील १० हजार रोख रक्कम एकुण ६५ हजार रुपये किंमतीचा सोने व रोख रक्कम लांबविले आहे.

नाशिकेत चावदस नेमाडे (रा.ओझरखेडा) यांच्या घरातील ५० ग्रॅम सोन्याच्या बांगळ्या, १० ग्रॅम सोन्याची चेन, ५० ग्रॅम सोन्याचे दागीने व रोख रक्कम २ लाख ५५ हजार रुपये अशी एकुण ४ लाख ७५ हजार लांबविले. या तिघांच्या फिर्यादीवरुन वरणगाव पोलिसात अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


श्वान चॅम्प पथक पाचारण -

तीन गावांमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी चोरी केल्याने चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी जळगाव येथील श्वान चॅम्प पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तर श्वान घरफोडी झालेल्या घराजवळच घुटमळल्याने चोरटे हे दुचाकी व चारचाकी वाहनाने आले असावेत असा पोलीसांनी अंदाज वर्तविला.

पथकात सपोनी सुदर्शन बोरसे, हेकॉ विनोद चव्हाण, भेसराव राठोड तसेच ठसे तज्ञ जिल्ह्याचे अंगोली मुद्रा पथक सपोनी वसंत कांबळे, हेकॉ चॅन्य प्री गृपचे फोटोग्राफर सचिन चौधरी, सहाय्यक फौजदार प्रकाश बारी, विनायक पाटील यांनी ठसे घेतले.


पोलीसांचे दोन पथके रवाना -

मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात पोलिसांचे पथक रवाना करण्यात आली आहेत. तसेच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी भेट देवुन पाहणी केली. यावेळी सपोनि आशिषकुमार आडसुळ व पोउनि परशुराम दळवी, नागेंद्र तायडे, राहुल येवले, प्रशांत ठाकुर यांना तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com