चाळीसगाव : पोळ्याचा दिवशीच बैलाचा दुदैवी मृत्यू

विद्युत तारेला स्पर्श होऊन बैलाचा शॉक
चाळीसगाव : पोळ्याचा दिवशीच बैलाचा दुदैवी मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शेतकर्‍याचा खरा मित्र असलेल्या सरजा-राज असलेल्या बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात येतो. परंतू या बैलपोळा सणाच्या दिवशीच तालुक्यातील तमगव्हाण येथे रस्त्यावर पडलेल्या तारेला स्पर्श होवून बैलाचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील तमगव्हाण येथील लक्ष्मण आनंदा सानप नामक शेतकर्‍याचा हा बैल होता. आज पोळा असल्याने लक्ष्मण सानम यांचा सालदार काळु भिल हा बैल नदीवर धुण्यासाठी घेवून जात असतांना रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श या बैलाला झाल्याने तो मयत झाला. पोळ्याच्याच दिवशी बैलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये महावितरण कंपनीच्या विरोधात गावात संताप व्यक्त होत होता. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com