
भुसावळ Bhusawal (प्रतिनिधी) -
सामान्य नागरिकाला (citizen) नगरपरिषदेकडून (Municipal Council) नळ कनेक्शन (Tap connection) हवे असल्यास नियमांचा बडगा उगारून फिरवा फिरव करणार्या नगरपरिषद प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहराला पाणी पुरवठा करणारी विशेष म्हणजे प्रमुख टाकी भरणार्या जामनेर रोड वरिल मेन राईजिंग पाईप लाईनला (Main Rising pipeline) जोडून नवीन कनेक्शनसाठी (new connections) डांबरीरस्ता खोदला (Dug an asphalt road) जात होता. मात्र नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी वेळीच हस्तक्षेप करून हे काम थांबवले.
जामनेर रोड, आदर्श हायस्कूल लगत तृप्ती डेअरीच्या समोर एका व्यापार्याचे मोठे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी या महाभागाने न.पा.च्या प्लंबर ठेकेदाराला हाताशी घेवून १५८० रूपयांच्या दोन पावत्या व पंधरा फुट रस्ता खोदण्याच्या परवानगीसाठी ३३० रूपयांची एक पावती फाडून सर्रास जामनेर रोडचे डांबर खोदायला घेतले. मुख्य रहदारीचा हा रस्ता खोदून काढला.
मुळात या प्रमुख लाईनी वरून जोडणी घेण्यास मनाई आहे. मात्र चिरिमीरी देवून चांगला रस्ता खोदण्याचा उपद्रव केला गेला आहे. विशेष म्हणजे शनिवार, रविवार पालिका बंद असते अशा दिवशी ही कामे केली जातात. सदर कामावर नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी हरकत घेवून हे काम बंद पाडले असल्याने सामान्य नागरिकांच्या हक्काच्या पाण्याची राजरोस होणारी चोरी थांबली आहे.
शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे मुख्य जलवाहिण्या फोडून पाणी घेण्यात येत आहे.
प्रमुख लाईनीवरून जोडणी घेणे गैर
नाहाटा चौफुलीवरील प्रमुख टाकी भरण्यासाठी जी चौदा इंची पाईपलाईन आहे त्यातून ही जोडणे करणे गैर आहे. पद व श्रीमंतीचा फायदा घेवून चिरिमीरी देवून सामान्य जनतेचे हक्काचे पाणी खाजगी व्यक्तीच्या घश्यात जावू दिले जाणार नाही. जिल्हाधिकारी साहेबांना हा व्हिडिओ पाठवून तक्रार करणार आहे.
-निर्मल (पिंटू) कोठारी, नगरसेवक