Breaking news मुक्ताईनगरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

पोलीसांनी लाखों रूपये किंमतीचा माल केला जप्त
Breaking news मुक्ताईनगरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

मुक्ताईनगर - प्रतिनिधी Muktainagar

मुक्ताईनगर तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून तेथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ हे इकडे येत असल्याचा आरोप आधीपासूनच करण्यात येत आहे. पोलिसांनी यावर अनेकदा कारवाई केली असली तरी देखील हा धंदा दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

आज मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला असून याची किंमत लाखोंमध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जप्त करण्यात आलेला ट्रक हा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला असून फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. तर याठिकाणी आ.एखनाथराव खडसे यांनी सुध्दा भेट दिली असल्याचे समजते.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com