Breaking # सोयगाव तालुक्यावर ढगफुटी....

बनोटी परिसरातील ३९ गावांचा संपर्क तुटला....पुराचे थैमान
Breaking # सोयगाव तालुक्यावर ढगफुटी....

सोयगाव,Soygaon

सोयगाव सह तालुक्यात रविवारी रात्रीपासून (Sunday night) सुरू झालेल्या पावसाचा जोर (Heavy rain) वाढल्याने रात्री सोयगाव तालुक्यावर (Soygaon Taluka) तब्बल १५ तासांचा संततधार ढगफुटीचा (Continuous cloudburst) पाऊस झाला आहे.या पावसामुळे (rain) बनोटी भागातील ३९ गावात पुराचे थैमान (height of the flood) सुरू होते, त्यामुळे ३९ गावांचा संपर्क (Contact of villages) सोमवारी दिवसभर तुटला (broke down) होता.

सोयगाव तालुक्यात रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने अचानक रौद्ररूप धारण केले होते, सोयगाव परिसरात पावसामुळे अनेक भागात शेती पाण्याखाली आली आहे. जरंडी मंडळातही अतिवृष्टी झाली असून या मंडळातील अनेक गावांत पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती..जरंडीच्या धिंगापूर धरण ओव्हरफलो झाल्याने या धरणातून सांडव्या द्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे धरण भागाच्या उगम स्थान असलेल्या निंबायती,रामपुरा,न्हावी तांडा,रामपुरवाडी या चार गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..

पूरग्रस्त स्थितीत सोयगाव तालुका

रविवारी रात्रीपासून झालेल्या १५ तासांच्या मुसळधार पावसात सोयगाव तालुक्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती सोयगाव तालुक्यातील सीयगव, जरंडी आणि बनोटी या तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे..

सोयगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे शेती पिकांचे नुकसान झाले असून महसूल विभागाच्या पथकांनी नुकसानीची पाहणी करून बाधित क्षेत्राची आकडेवारी संकलित केली आहे..

सोयगाव तालुक्यात झालेल्या धगफुटीच्या पावसामुळे ३९ गावांचा संपर्क तुटला असून बनोटी आणि जरंडी या दोन महसूल मंडळातील बनोटी मंडळ-३९ गावे तर जरंडी मंडळातील १७ गावे असा ५६ गावात पूरग्रस्त स्थिती उद्भवल्यानें या गावातील नागरिकांच्या मदतीसाठी महसूल विभागाचे पथक रस्त्यावर उतरले होते नायब तहसिलदार विठ्ठल जाधव,शरद पाटील,अनिल पवार, आदींसह पथकाने नागरिकांना धीर देऊन मदतकार्य केले पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेटी देऊन त्यांची माहिती घेतली

दहा गावांना सतर्कतेचा आदेश

नदी पात्राचा काठावर असलेल्या दहा गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आले असून या नद्यांच्या पुरात वाढ झाल्यास या ठिकाणी नागरिकांची स्थलांतराची पूर्वतयारी प्रशासनाने हाती घेतली आहे... दरम्यान झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे बनोटी मंडळात मोठा कहर केला असून बनोटी परिसरातील नद्या दुथडी भरून धोक्या च्या पातळीने वाहत होत्या...

कालदारी गावात पुराचे पाणी शिरले

दरम्यान अजिंठ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काळदरी गावात पुराचे पाणी शिरले असून शेतात काढणीसाठी तयार करून ठेवलेल्या बाजाराला पुराने कवेत घेऊन वाहून नेलें आहे त्यामुळे नुकसान झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com