BREAKING # नशिराबाद टोल नाक्यावर आढळले बोगस मशीन

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने कारवाई
BREAKING # नशिराबाद टोल नाक्यावर आढळले बोगस मशीन

जळगाव- jalgaon

येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आशीर्वाद नशिराबाद टोलनाक्यावर (Ashirbad Nashirabad toll plaza) वाहनधारकांना (motorists) बोगस मशीनच्या (bogus machines) सहाय्याने पावत्या (Receipts) देऊन आर्थिक लूट (financial loot) होत असल्याबाबत प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता (Right to Information Activist Deepak Kumar Gupta) यांनी केलेल्या तक्रारीनंतर आज सायंकाळी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने (order of the Superintendent of Police) टोलनाक्यावर तपासणी (Inspection at toll booth) केली असता दोन बोगस मशीन आढळून आले. याबाबत नशीराबाद पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अंतर्गत असत ते चिखली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जळगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नशिराबाद टोलनाक याविषयी सुरुवातीपासूनच तक्रारी येत होत्या. या टोलनाक्याच्या माध्यमातून बोगस पावत्या देऊन वाहनधारकांची लूट होत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी दखल घेत नशिराबाद येथील पोलिसांमार्फत टोलनाक्याची चौकशी केली. त्या ठिकाणी दोन बोगस मशीन आढळून आल्या. पोलिसांनी या दोन्ही मशीन ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

न्हाइ आज कारवाई करणार

माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी न्हाइचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना बोगस मशीन बाबत माहिती दिली असता पोलीस कारवाईचा अहवाल आल्यानंतर महामार्ग प्रशासनाकडून कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com