ब्राह्मण अब उठा है ललकार... नही सहेगा अत्याचार

शोभायात्रेने भगवान परशुराम जयंती जल्लोषात साजरी
ब्राह्मण अब उठा है ललकार... नही सहेगा अत्याचार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शास्त्र आणि शस्त्रविद्येचे महावीर भगवान परशुराम (Mahavira Lord Parasurama) यांच्या जयंतीनिमित्त (anniversary) काढण्यात आलेल्या शोभायात्रेने (Shobha Yatra) शहरवासियांचे लक्ष वेधले होते. दरम्यान ढोल आणि लेझीम पथकाच्या गजरात भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात येवुन महाआरतीने शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

बहुभाषिक ब्राह्मण संघ (Multilingual Brahmin Association) आणि समस्त ब्राह्मण समाजातर्फे (Brahmin community) भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रेचे (Shobha Yatra) आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेसाठी आठदिवसांपासून ढोल आणि लेझीम पथकाचा सराव सुरू होता. सायंकाळी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरापासून भगवान परशुराम यांची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा निघण्यापुर्वी भगवान परशुराम यांच्या धर्नुधारी पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठीत मान्यवरांसह बहुभाषिक ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

चिमुकल्यांनी साकारल्या वेशभूषा

यावेळी ब्राह्मण समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व तसेच थोर समाजसुधारक आदींच्या वेशभूषा (Costume) लहान मुलांनी साकारत लक्ष वेधले. लहान मुलांचा उत्साह यावेळी वाखाणण्याजोगा होता. सायंकाळी शोभायात्रा दाणा बाजारातील पिपल्स बँक चौकात पोहोचल्यावर त्याठिकाणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी आ राजुमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, अ‍ॅड. सुशिल अत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ अजित नांदेडकर व बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा मनिषा दायमा यांनी आभार मानले.

यावेळी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक श्रीकांत खटोड, नंदलाल व्यास, भरत अमळकर, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, सत्यनारायण खटोड, विश्वनाथ जोशी, अशोक वाघ, सुशील असोपा, डॉ. मिलींद जोशी, डॉ. प्रिती जोशी, मिलींद बुवा, डॉ. राजेश डाबी, श्रध्दा कुळकर्णी, डॉ. प्रदीप तळवलकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री 9.30 वा. बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

भगवा फेटेधारी ढोल- लेझीम पथकाचे आकर्षण

भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते. भगवे फेटेधारी महिलांनी लेझीम खेळत शोभायात्रेत सहभाग नोंदविला. तसेच 50 ढोल व 10 ताशे श्रीमंत बाजीराव पेशवा व राणी लक्ष्मीबाई अशा दोन ढोलपथकाच्या गजरानेही शहर दणाणले होते.

चिमुकल्यांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वच समाजबांधव आज जयंतिनिमित्ताने एकसंघ दिसून आले. यावेळी जय परशुराम जय जय परशुराम च्या घोषणा देण्यात आल्या. जब जब ब्राह्मण बोला है राजसिहसन डोला है, गो माता के रक्षक है या सारख्या घोषणा देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.